शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

एटीएम झाले ब्लॉक अन व्यवहार झाले लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 21:38 IST

सायबर गुन्ह्यांच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे.त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने जुने एटीएम डेबिट कार्ड बंद करुन नवीन डेबिट कार्ड देण्याचा निर्णय विविध बँकांनी घेतला आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांची एटीएम कार्ड अचानक ब्लॉक होत असल्याने ग्राहकांच्या आर्थिक व्यवहारांना लॉक लागले आहे.

ठळक मुद्देग्राहकांची बँकाकडे धाव : जिल्ह्यातील चार लाखांवर ग्राहकांना फटका, नवीन एटीएम मिळण्यास विलंब

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सायबर गुन्ह्यांच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे.त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने जुने एटीएम डेबिट कार्ड बंद करुन नवीन डेबिट कार्ड देण्याचा निर्णय विविध बँकांनी घेतला आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांची एटीएम कार्ड अचानक ब्लॉक होत असल्याने ग्राहकांच्या आर्थिक व्यवहारांना लॉक लागले आहे.रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार सर्वच बँकानी जुने एटीएम कार्ड बदलून दर्शनी भागात छोट्या चिपचा समावेश असलेले नवीन एटीएम कार्ड देण्यास सुरूवात केली आहे. मात्र याचा फटका अनेक ग्राहकांना बसत आहे. बँकेकडून अचानक एटीएम कार्ड ब्लॉक केले जात असल्याने ग्राहकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. कार्ड ब्लॉक झाल्यानंतर ग्राहकांनी त्वरीत बँकाशी संपर्क साधल्यानंतर त्यांना नवीन कार्ड त्वरीत वितरीत केले जात असल्याचे बँकेचे अधिकारी सांगत आहे. मात्र प्रत्यक्षात ग्राहकांना आठ आठ दिवस एटीएम कार्ड मिळत नसल्याने त्यांचे आर्थिक व्यवहार अडचणीत आले आहे. तर नागरिकांना नव्याने मिळालेले डेबिटकार्ड बंद पडल्याच्या वाढत्या तक्रारी बँक अधिकाऱ्यांना प्राप्त होत असल्याने खातेदारांना पुन्हा नव्याने अर्ज करण्यास सांगण्यात येत आहेत. बँक आॅफ इंडियाच्या अनेक खातेदारांना या त्रासाचा सामना करावा लागत आहे. अनेक बँकामधून खातेदारांच्या खात्यातून आॅनलाईन पद्धतीने पैसे चोरीला गेलेल्याच्या तक्रारी सायबर पोलीस ठाण्यात वाढल्या आहे. याला आळा घालण्यासाठी आरबीआयच्या निर्देानुसार सर्व बँकांनी ३१ डिसेंबरला जुने एटीएम डेबिटकार्ड बंद करुन खातेदारांना मास्टर चीप लावलेले नवीन डेबिटकार्ड देण्यात येत आहे. विविध बँकांच्या खातेदारांना नवीन मास्टर चीप लावलेले एटीएम डेबिट कार्ड घरपोच मिळाले आहेत. ज्यांना ते कार्ड मिळाले नाहीत, त्यांनी बँकाकडे धाव घेतली आहे. अनेकांना बँकेतून डेबिटकार्ड प्राप्त होत असून अनेकांना मात्र अद्यापही डेबिटकार्डसाठी बँकाकडे धाव घ्यावी लागत आहे. ज्यांना नवीन डेबिटकार्ड मिळाले नाही. त्यांचे आर्थिक व्यवहार अडचणीत आले आहे. काही बँक ग्राहकांना नवीन डेबिट कार्ड मिळाल्यानंतर ते अ‍ॅक्टिव्हेट करण्यात आले. परंतु पुन्हा पैसे काढण्यासाठी गेले असता हॉटलिस्टेड झाल्याची स्लिप निघत आहे. त्याचप्रमाणे एटीएममध्ये एरर असल्याचा मॅसेज येतो. कार्ड हॉटलिस्ट झाल्याची स्लिप नागरिकांना प्राप्त होत आहे. त्यामुळे नागरिकांची डोकेदुखी अधिक वाढत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात विविध बँकाचे चार लाखावर ग्राहक असून या सर्वांचे एटीएम कार्ड बदलण्यात येणार असल्याची माहिती आहे. या संदर्भात बँकेच्या अधिकाºयांशी संपर्क साधला असता त्यांनी यावर अधिक बोलणे टाळले.एटीएम बंद झाल्यावर काय करावे३१ डिसेंबर २०१८ रोजी जुने एटीएम डेबिटकार्ड बंद झालेल्या खातेदारांना विविध बँकांनी नवीन डेबिटकार्ड दिले. अशा खातेदारांनी संबंधित बँकेच्या एटीएमवर केंद्रावर जाऊन कार्ड अ‍ॅक्टिव्हेट करुन द्यावे. त्याला नवीन पासवर्ड द्यावा. बँकेत जो मोबाईल क्रमांक दिला असेल व ते सिम बंद असेल तर नवीन मोबाईल नंबर बँकेला द्यावा. कुठल्याही एटीएमवरुन आॅनलाईन व्यवहार किंवा खरेदी करायची असेल तर ओटीपी येतो. (वन टाईम पासवर्ड) तो मैसेज बंद असलेल्या नंबरवर गेल्यास खरेदी होणार नाही, असे अधिकाºयांनी स्पष्ट केले. जर नवीन मास्टर डेबिटकार्ड हॉटलिस्ट होत असेल तर बँकेकडे पुन्हा नव्याने अर्ज करावा लागणार आहे.रजिस्टरमध्ये शोधा आपले नावअग्रेसन चौकातील बँक आॅफ इंडियामध्ये ज्या खातेदारांचे नवीन डेबिट कार्ड आले आहेत. त्यांची माहिती अधिकाºयांनी येथे उपलब्ध केलेल्या रजिस्टरमध्ये नमूद आहे. मात्र डेबिट कार्ड घेण्यासाठी येणाºया खातेदाराला जवळपास त्याचे नाव शोधण्याकरिता अर्धा ते एक तास लागत आहे. त्यामुळे ग्राहकांची डोकेदुखी वाढत आहे. विशेष म्हणजे यामुळे अनेकांना आपली महत्त्वाी कामे सोडून बँकेत जाऊन रजिस्टरमध्ये नाव शोधावे लागत आहे.गैरप्रकाराला आळा घालण्यास मदतआपला डेबिट कार्ड हरवले किंवा चोरीला गेला तरी डेबिट कार्डवर असलेल्या हॉटलिस्टिंग नंबरवर आपण कार्ड बंद करु शकतो. तो क्रमांक सुरक्षित ठिकाणी ठेवावा, कारण डेबिट कार्डाच्या मागील बाजूचे नंबर महत्वाचे आहे. अलीकडे आॅनलाईन सायबर क्राईमचे गुन्हे वाढले आहेत. याला आळा बसावा. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून नवीन डेबिट कार्डमध्ये मास्टर चिप बसविली आहे. कुणी चुकीचा पासवर्ड टाकण्याचा प्रयत्न केल्यास खातेदारांना व बँकेला मॅसेजद्वारे त्वरित ही माहिती पोहोचते.यामुळे बँकाही अलर्ट होतात,अशी माहिती बँक व्यवस्थापकांनी दिली.

टॅग्स :atmएटीएमbankबँक