बाहेरुन येणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी ग्रामसुरक्षा दलाची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:00 IST2020-04-21T05:00:00+5:302020-04-21T05:00:15+5:30
गोंदिया जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. तर यापुढेही जिल्हा कोरोनामुक्त राहावा यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाय योजना केल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. त्यामुळे काहीजण जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी आड मार्गाचा अवलंब करीत आहे

बाहेरुन येणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी ग्रामसुरक्षा दलाची मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
इसापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा आणि पोलीस प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. बाहेरील जिल्हा व राज्यातून कुणी जिल्ह्यात विनापरवानगी प्रवेश करु नये यासाठी पोलीस विभागाने ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. यासाठी आता अर्जुनी मोरगाव पोलिसांनी ग्राम सुरक्षा दलाची मदत घेतली जात आहे.
गोंदिया जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. तर यापुढेही जिल्हा कोरोनामुक्त राहावा यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाय योजना केल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. त्यामुळे काहीजण जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी आड मार्गाचा अवलंब करीत आहे. ही बाब लक्षात घेत देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी कोकणा गोंडउमरी-परसोडी, ऊकारा बोपाबोडी, श्रीरामनगर आदी गावातील सरपंच तंटामुक्त समिती, ग्राम सुरक्षा दलाच्या मदतीने परिसरात नाकाबंदी केली.
डु्ग्गीपार कार्यक्षेत्रातील भंडारा जिल्हाच्या सीमेलगत असलेल्या कोकणा, गोंडउमरी, परसोडी, ऊकारा, बोपाबोडी, श्रीरामनगर या गावांना भेटी देऊन गावकऱ्यांशी चर्चा केली. जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांच्या मदतीला पाच ते सहा ग्राम सुरक्षा दलाच्या सदस्यांची मदत घेतली. बाहेर जिल्ह्यातून व राज्यातून जिल्ह्यात प्रवेश करणाºया व्यक्तींना रोखून कोरोनाचा संसर्ग टाळण्यास मदत होत आहे.