Arranged 100 people in one place | एकाच जागी केली १०० जणांची व्यवस्था

एकाच जागी केली १०० जणांची व्यवस्था

ठळक मुद्देप्रशासनाकडूनच नियमांचे उल्लघंन : म्हणे वेगळ्या ठिकाणी करणार व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बाहेरून जिल्ह्यात परतलेले लोक येथे अडकले. जिल्हा प्रशासनाने त्यांची मनोहर म्युनिसीपल हायस्कूल येथे नेऊन त्यांना ठेवले. एकाच ठिकाणी १०० पेक्षा अधिक लोकांना ठेवण्यात आले. परंतु त्यांच्यासाठी काही साधन उपलब्ध करण्यात आले नाही. प्रशासन आपल्या नियमाचे उल्लघंन करताना दिसत आहेत.
२२ मार्चला प्रधानमंत्री यांच्या आवाहनावरून जनता कर्फ्यू लावण्यात आला होता.दरम्यान रेल्वे गाड्यांचे येणे-जाणे बंद करण्यात आले होते. राज्य परिवहन निगमच्या बसेस व खासगी वाहन सेवा बंद करण्यात आली. काही गाड्या सुरू होत्या.त्यामुळे ते गोंदियापर्यंत आले होते. परंतु त्यांना आपल्या घरी जाण्याचे साधन उपलब्ध झाले नाही. या लोकांची दखल २४ मार्चला जिल्हा प्रशासनाने घेतली. जिल्हा प्रशासनाने अश्या व्यक्तींसाठी मनोहर म्युनीसीपल स्कूलमध्ये राहण्याची व्यवस्था केली. २४ मार्चला सायंकाळी ७५ जणांना या ठिकाणी ठेवण्यात आले. २५ मार्चला पुन्हा ठेवण्यात आले. त्यामुळे त्यांची संख्या १०० च्या वर गेली आहे. यात बाहेरून येणारे व घरी न जाऊ शकणारे, तसेच रेल्वेस्थानकाच्या परिसरात आपले घर बनविणाऱ्यांचा समावेश आहे.
या ठिकाणचे निरीक्षण केल्यावर कोणतीच व्यवस्था उपलब्ध नव्हती. पाणी पिण्यासाठी फक्त एक ड्रम होता. साबणाची व्यवस्था नव्हती. १०० पैकी एकाही व्यक्तीने आंघोळ केली नव्हती. विचारपूस केल्यावर कसलीही व्यवस्था नसल्याचे सांगण्यात आले.बहुतांश लोकांकडे मास्क नव्हते. काहींनी मास्क स्वत: खरेदी केले. संपूर्ण परिसरात सॅनिटायझर करीता काही प्रयत्नच करण्यात आले नाही. परिस्थितीमुळे अडकलेले लोक कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून आपला कसा बचाव करतील. शाळा परिसरातील मोटार बिघडली. वायर जळल्याने ही स्थिती आली.
या परिसराचे निरीक्षण करण्यासाठी परीवेक्षाधिन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या लक्षात ही बाब आल्यावर त्यांनी ती मोटार दुरूस्ती करण्याचे आदेश दिलेत. परंतु बातमी लिहीपर्यंत व्यवस्था झाली नव्हती. २४ मार्चच्या सायंकाळी श्री टॉकीजच्या चौरसिया ग्रुप,५ मार्चला दुपारी जैन फ्रूटकडून जेवणाची व्यवस्था करण्यात आली. कुणी जर व्यवस्था करायला पुढे येत नसले तर आम्ही व्यवस्था करण्यास पुढाकार घेऊ असे नितेश जैन, नवीन जैन, संदीप जैन यांनी सांगितले.

प्रत्येकाला वाटते घरी पोहचावे
बालाघाट जिल्ह्याच्या लालबर्रा तालुक्याच्या देवरी येथील पुरूषोत्तम जगन्नाथ विवाह समारोहात कारागीर म्हणून काम करतात. ते एका लग्नाच्या पार्टीत काम करायला आले होते तर ते अडकले. रायपूर येथील विनोद भोयर कॅटरिंगच्या कामासाठी आले होते. आणि ते सुध्दा इथेच अडकले. वडसा येथील विजय उमरे रायपूरमध्ये काम करायला आले होते. ते सुध्दा पत्नी व दोन वर्षाच्या मुलीला घेऊन गावाला जाण्यासाठी गोंदियात आले होते. परंतु त्यांच्या भाग्यात शाळेत राहण्याची वेळ आली. तेंदूपत्तावरून परतणाºया कालीमाटी येथील रामदास गौतम,रायपूरवरून परतलेले बालाघाट जिल्ह्याच्यासांढरा येथील अशोक सुलाखे व इतर लोकांना ते आपल्या घरी कधी परततील अशी चिंता त्यांना आहे.

आता लोकांना आणून ठेवले आहे. त्यांची व्यवस्था करायला वेळ लागेल. या ठिकाणावरून इतर दोन-तीन शाळेत त्यांना नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.त्यांच्यासाठी सर्व सोयीसुविधा केल्या जातील.
-वंदना सवरंगपते, उपविभागीय अधिकारी गोंदिया.

Web Title: Arranged 100 people in one place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.