सर्वच विषयांना स्थायी समितीची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST2019-12-24T05:00:00+5:302019-12-24T05:00:17+5:30

६ महिन्यांनंतर घेण्यात आलेली नगर परिषद स्थायी समितीची सभा अवघ्या तासाभरातच आटोपली. सभेत उपस्थित सदस्यांच्या मंजुरीने विषयसूचीतील सर्वच विषयांना मंजूर करण्यात आल्याने शांततेत ही सभा पार पडली. प्रोफाईल बुक छपाईसाठी निधीची तरतूद करणे, वशिला पद्धतीवर सफाई कामगारांच्या वारसदारांना नियुक्ती प्रदान करणे, कर्मचाऱ्यांचे ऐच्छीक सेवानिवृत्तीबाबत प्राप्त अर्जास मंजुरी, पाणी पुरवठा विभागाचे हातपंप दुरूस्ती, पंपहाऊस पेंटींग व दरवाजे फिटींग करण्यासाठी ई-निविदा आमंत्रित करणे,

The approval of the Standing Committee on all matters | सर्वच विषयांना स्थायी समितीची मंजुरी

सर्वच विषयांना स्थायी समितीची मंजुरी

ठळक मुद्देएका तासात सभा समाप्त : आज सर्व साधारण सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ६ महिन्यांनंतर घेण्यात आलेली नगर परिषद स्थायी समितीची सभा अवघ्या तासाभरातच आटोपली. सभेत उपस्थित सदस्यांच्या मंजुरीने विषयसूचीतील सर्वच विषयांना मंजूर करण्यात आल्याने शांततेत ही सभा पार पडली.
प्रोफाईल बुक छपाईसाठी निधीची तरतूद करणे, वशिला पद्धतीवर सफाई कामगारांच्या वारसदारांना नियुक्ती प्रदान करणे, कर्मचाऱ्यांचे ऐच्छीक सेवानिवृत्तीबाबत प्राप्त अर्जास मंजुरी, पाणी पुरवठा विभागाचे हातपंप दुरूस्ती, पंपहाऊस पेंटींग व दरवाजे फिटींग करण्यासाठी ई-निविदा आमंत्रित करणे, सातव्या वेतन आयोगानुसार वेतन बिल तयार करण्यासाठी संगणीकृत वेतन प्रणाली खरेदी करिता खर्च कार्योत्तर मजुरी देणे, अध्यक्ष व नगर परिषदेच्या विविध विभागाकरिता संगणक संच व प्रिंटर खरेदीच्या कार्योत्तर मंजुरी तसेच नगर परिषद लेखा संबंधित कार्य करण्यासाठी सी.ए. नियुक्त करणे आदि विषय सूचीत होते.
या सर्वच विषयांना सभेला उपस्थित सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली. परिणामी तासाभरातच स्थायी समितीची सभा आटोपली. सभेला नगराध्यक्ष अशोक इंगळे, उपाध्यक्ष शिव शर्मा, पक्ष नेता घनशाम पानतवने, सभापती बेबी अग्रवाल, सचिन शेंडे, मौसमी परिहार (सोनछात्रा), नेहा नायक, क्रांती जायस्वाल उपस्थित होते.

आज सर्व साधारण सभा
२७ जून नंतर म्हणजेच ६ महिन्यांच्या कालावधीनंतर नगर परिषद सर्व साधारण सभेचा मुहूर्त निघाला असून मंगळवारी (दि.२४) सभा बोलाविण्यात आली आहे. १७ विषयांना घेऊन बोलाविण्यात आलेल्या या सभेत काही महत्वपूर्ण विषय असल्याने शिवाय काही वादग्रस्त विषयांना घेऊन सभेत काय होते याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. सभेत श्रीनगर क्षेत्रातील मराठा बियर बार अन्यत्र स्थानांतरीत करणे किंवा बंद करणे, डोंगर तलाव व चावडी तलाव बांधकाम व सौंदर्यीकरण करणे, प्रभाग क्रमांक ४ मधील पाणी टाकी जवळील जागेवर उद्यानाचा विकास करणे, इंदिरा गांधी स्टेडियममधील १२०० स्क्वे.फूट जागा सहायक कामगार आयुक्त कार्यालयाला ३ वर्षांसाठी भाड्याने देणे तसेच नगर परिषद कार्यालय व शाळांकरिता स्टेशनरी, छपाई व फर्निचर साहित्याची निविदा आमंत्रित करणे आदि विषयांवर चर्चा होणार आहे.

गाळे फेरलिलावास व्यापाऱ्यांचा विरोध
नगरसेवक बंटी पंचबुद्धे यांच्या मागणीवरून सर्व साधारण सभेत नगर परिषदेच्या १०७७ गाळ्याचा फेरलिलाव करण्याचा विषय घेण्यात आला आहे. मात्र या विषयाला येथील व्यापारी संघांनी विरोध दर्शविला आहे. यासाठी त्यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना सह्या केलेले पत्र दिले आहे. यामध्ये किराना तेल व्यापारी संघ, चिल्लर किराना व्यापारी संघ, इंदिरा गांधी व्यापारी संघ, अनाज थोक व चिल्लर व्यापारी संघ, कपडा लाईन व्यापारी संघ व पुराना गंज व्यापारी संघाचा समावेश आहे.

Web Title: The approval of the Standing Committee on all matters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.