१ कोटी ७५ लाखांच्या विकास कामांना मंजुरी

By Admin | Updated: August 30, 2014 23:53 IST2014-08-30T23:53:42+5:302014-08-30T23:53:42+5:30

गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ग्रामसभा, जनसंपर्क दौऱ्यात कार्यकर्ते व नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार आ.गोपालदास अग्रवाल यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विनंती करून ५८ विकास

Approval of development works of 1 crore 75 lakh | १ कोटी ७५ लाखांच्या विकास कामांना मंजुरी

१ कोटी ७५ लाखांच्या विकास कामांना मंजुरी

गोंदिया : गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ग्रामसभा, जनसंपर्क दौऱ्यात कार्यकर्ते व नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार आ.गोपालदास अग्रवाल यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विनंती करून ५८ विकास कामांसाठी एक कोटी ७५ लाखांच्या निधीस मंजुरी मिळवली आहे. यात लहान सभागृह, सिमेंट रस्ते, शाळांच्या आवार भिंती व मुस्लिम समाजाच्या कब्रस्थानच्या आवारभिंतींच्या बांधकामांचा समावेश आहे.
या निधीतून अदासी (गोंडिटोला) येथे रस्त्याचे खडीकरण, तांडा (शिवाटोला) येथे सभामंडप बांधकाम, पोवारीटोला येथे रस्त्याचे सिमेंटीकरण, गोंडीटोला येथे बिरसा मुंडा सभामंडप, आवारीटोला (गुदमा) येथे सभामंडप, गुदमा येथे सभामंडप, आसोली येथे सभामंडप, नवरगाव खुर्द जि.प. शाळेची आवारभिंत, मोरवाही येथे सभामंडप, काटीमधील इंदिराटोली येथे सभामंडप, कासा येथे स्मशानघाट रस्ता व मोरी, काटी रेल्वे स्थानक रस्ता, ढिवरटोली येथे जि.प. शाळेची आवारभिंत, गोंडीटोला (कटंगी) येथे रस्ता, डांगोर्ली येथे रस्ता, रावणवाडी येथे रस्ता, अर्जुनी येथे सभामंच, फुलचूर येथे रस्ता, पांजरा येथे प्रवेशद्वार, जब्बारटोला येथे सभामंच, हलबीटोला येथे सभामंडप, किन्ही येथे रस्ता, तांडा येथे रस्ता, काटी येथे रस्ता, कामठा येथे रस्ता, धामनगाव बुद्धविहारात चावडी, कोचेवाहीच्या बुद्धविहारात चावडी, पांजरा येथे अंतर्गत रस्ता, गुदमा (आवारीटोला) येथे अंतर्गत रस्ता, गोंडीटोला (अदासी) येथे चावडी, रतनार (गोंडीटोला) येथे चावडी, चिरामनटोला येथील बिरसा मुंडाच्या पुतळ्याजवळ चावडी, झिलमिली येथे चावडी, मरारटोला (तेढवा) येथे समाजभवन, घिवारी येथे जि.प. शाळेची आवारभिंत, सोनबिहरी येथे जि.प. शाळेची आवारभिंत, हलबीटोला येथे चावडी, झिटाबोडी येथे चावडी, दासगाव बु. येथे गोवारी चौकात चावडी, फुलचूर येथे सभामंडप, बरबसपुरा येथे सभामंडप, मोगर्रा येथे अंतर्गत रस्ता, गोंडीटोला (रावणवाडी) येथे रस्ता, कटंगी येथे रस्ता, रतनारा (सलंगटोली) येथे सभामंडप, सतोना येथे रविदास यांच्या पुतळ्याजवळ सभामंडप, सिवनी येथे अंतर्गत रस्ता, रतनारा येथे रस्ता, अदासी येथे रस्ता, खातिया येथे रस्ता, हलबीटोला येथे अंतर्गत रस्ता, दतोरा येथे रस्ता, झिलमिली येथे रस्ता, मुंडीपार खुर्द येथे अंतर्गत रस्ता इत्यादी विकास कामे करण्यात येणार असल्याचे आ.अग्रवाल यांनी कळविले. (प्रतिनिधी)

Web Title: Approval of development works of 1 crore 75 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.