सरपंच-उपसरपंच निवडणुकीसाठी अध्यासी अधिकाऱ्यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:53 IST2021-02-06T04:53:57+5:302021-02-06T04:53:57+5:30
बोंडगावदेवी : तालुक्यातील २८ ग्रामपंचायतीच्या सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी अध्यासी अधिकारी म्हणून १४ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन टप्प्यांत ...

सरपंच-उपसरपंच निवडणुकीसाठी अध्यासी अधिकाऱ्यांची नियुक्ती
बोंडगावदेवी : तालुक्यातील २८ ग्रामपंचायतीच्या सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी अध्यासी अधिकारी म्हणून १४ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन टप्प्यांत निवडणूक पार पडली जाणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार विनोद मेश्राम यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
१५ जानेवारी रोजी तालुक्यातील २८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊन १८ जानेवारी रोजी मतमोजणी झाली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांची यादी २९ जानेवारी रोजी प्रसिद्ध केली होती. तालुका निवडणूक अधिकारी मेश्राम यांनी सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी अध्यासी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे पत्रक काढून ११ व १२ फेब्रुवारी रोजी निवडणूक कार्यक्रम घोषित केला. यामध्ये, कुंभीटोला व तिडका ग्रामपंचायतसाठी अध्यासी अधिकारी म्हणून नायब तहसीलदार के. एन. वाढई, महागाव-ईळदा ग्रामपंचायतसाठी नायब तहसीलदार एम. यू. गेडाम, केशोरी-बोंडगाव (सुरबन) ग्रामपंचायतीसाठी पंचायत समिती कृषी अधिकारी व्ही. आर. निमजे, बोरटोला-सावरटोला ग्रामपंचायतीसाठी कृषी विस्तार अधिकारी बी. के. बंडगर, देवलगाव-सिलेझरी ग्रामपंचायतीसाठी पंचायत समिती सांख्यिकी विस्तार अधिकारी आर. टी. निखारे, बाराभाटी-बोंडगावदेवी ग्रामपंचायतीसाठी शिक्षण विस्तार अधिकारी ए. एस. बरईकर, येगाव-जानवा ग्रामपंचायतीसाठी गटशिक्षणाधिकारी आर. एल. मांढरे, कवठा-माहूरकुडा ग्रामपंचायतीसाठी मंडळ अधिकारी ए. के. मेश्राम, दिनकरनगर-करांडली ग्रामपंचायतीसाठी मंडळ अधिकारी पी. बी. तिवारी, कोरंभीटोला-मांडोखाल ग्रामपंचायतीसाठी तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी एस. आय. पवार, प्रतापगड-झाशीनगर ग्रामपंचायतीसाठी तलाठी पी. एस. कापगते, परसटोला-कन्हाळगाव ग्रामपंचायत तलाठी पी. एस. कुंभरे, परसोडी (रय्यत)-पवनी (धाबे) ग्रामपंचायतीसाठी तलाठी एस. एच. हरिखणेडे, बोरी-इसापूर ग्रामपंचायतसाठी तलाठी एच. एच. टेंभरे यांची अध्यासी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सरपंच-उपसरपंचपदाच्या निवडणुका दोन टप्प्यांत घेतल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात ११ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये कुंभीटोला (सरपंचपदाचा प्रवर्ग सर्वसाधारण), महागाव (अनु.जाती), केशोरी (नामाप्र), बोरटोला (अनु.जाती स्त्री), देवलगाव (सर्वसाधारण स्त्री), बाराभाटी (अनु.जमाती), येगाव (सर्वसाधारण), कवठा (अनु.जाती), दिनकरनगर (सर्वसाधारण स्त्री), कोरंभीटोला (नामाप्र स्त्री), प्रतापगड (नामाप्र), परसटोला (सर्वसाधारण), परसोडी/रय्यत (नामाप्र स्त्री), बोरी (नामाप्र) या १४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे, तर दुसऱ्या टप्प्यांत १२ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये तिडका (सर्वसाधारण स्त्री), इळदा (अनु.जमाती स्त्री), बोंडगाव सुरबन (नामाप्र स्त्री), सावरटोला (नामाप्र), सिलेझरी (सर्वसाधारण स्त्री), बोंडगावदेवी (नामाप्र स्त्री), जानवा (नामाप्र), माहूरकुडा (नामाप्र), करांडली (सर्वसाधारण स्त्री) मांडोखाल (नामाप्र स्त्री), झाशीनगर (अनु.जमाती स्त्री), कन्हाळगाव (अनु.जमाती), पवनी/धाबे (अनु.जाती स्त्री), इसापूर (सर्वसाधारण स्त्री) या १४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
----------------------
दावेदारी पुढे झाल्याने पेच वाढला
ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होताच गावचा कारभारी बनण्यासाठी एकापेक्षा जास्त उमेदवारांनी दावेदारी केल्याने पॅनल प्रमुखांसमोर आव्हानात्मक पेच निर्माण झाला आहे. आपली कमान कायम राहण्यासाठी गावातील मुत्सद्दी सर्वतोपरी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. आरक्षणामुळे सरपंचपदाचे बाशिंग बांधून असणाऱ्यांना पाणी फेरावे लागले. बोरटोला इंजोरी या गट ग्रामपंचायतीमध्ये नऊ सदस्य आहेत. एका गटाकडे सहा, तर दुसऱ्या गटाकडे तीन सदस्य आहेत. सरपंचपदाचे आरक्षण अनु.जाती स्त्रीसाठी निघाले. ज्या गटाकडे बहुमत असून, सुद्धा अनु.जाती प्रवर्गातील महिला उमेदवार नसल्याने अखेर सरपंचपदापासून दूर राहण्याची पाळी दिसत आहे. सरपंचपदासाठी दावेदारी करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने गुंता अधिक वाढत असल्याचे दिसत आहे.