प्रत्येक शाळेत नृत्य शिक्षकाची नियुक्ती करा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:33 IST2021-01-16T04:33:50+5:302021-01-16T04:33:50+5:30
केशोरी : ग्रामीण भागातील कलावंतांना वाव देण्यासाठी त्यांच्या अंगी असलेल्या कलेला चालना मिळण्यासाठी राज्यभरात नृत्य परिषद कार्य करीत आहे. ...

प्रत्येक शाळेत नृत्य शिक्षकाची नियुक्ती करा ()
केशोरी : ग्रामीण भागातील कलावंतांना वाव देण्यासाठी त्यांच्या अंगी असलेल्या कलेला चालना मिळण्यासाठी राज्यभरात नृत्य परिषद कार्य करीत आहे. नृत्य परिषदेच्या सर्व सदस्यांना शासकीय योजनांचा लाभ तथा निवृत्ती वेतन, प्रत्येक शाळांमध्ये चारशे विद्यार्थ्यांमागे एक नृत्य शिक्षकांची नेमणूक करणे, वर्ग संचालक, नृत्य दिग्दर्शक यांच्यासाठी अभ्यासक्रम शिबिरे आयोजित आदी मागण्यांसाठी ही परिषद शासन स्तरावर पाठपुरावा करीत आहे.
कलाकारांना सवलतीचे शासकीय निवासस्थान मिळवून देण्याबरोबर विद्यापीठीय अभ्यासक्रमामधून लोकनृत्य आणि पाश्चात्य नृत्याचा मान्यताप्राप्त विद्यापीठाअंतर्गत नृत्याचे प्रशिक्षण वर्ग नियमित चालविण्याचे कार्य सदोदित महाराष्ट्र नृत्य परिषदेच्या मार्फत राबविले जात असल्याचे विदर्भ विभाग प्रमुख कुणाल आनंदम यांनी सांगितले. राज्यातील सर्व नृत्य कलाकारांना एका छताखाली आणण्याचे काम या संघटनेच्या माध्यमातून केले जात आहे. प्रत्येक कलाकारांना विमा मिळवून देणे, जिल्हानिहाय नृत्य गृह उभारणे, नव्या कलाकारांना कलेसाठी संधी उपलब्ध करुन देणे, कलाकारांच्या अडचणी सोडविणे आदी काम केले जाते. या परिषदेच्या संस्थापक अध्यक्ष म्हणून प्रख्यात कथ्थक नृत्यगुरु मनिषा साठे असून चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, चित्रपट अभिनेत्री मधू कांबीकर कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्य करीत आहेत. नृत्य परिषद महाराष्ट्र शाखेची बैठक गोंदिया येथे पार पडली. या बैठकीत नृत्य परिषदेचे विदर्भ प्रमुख कुणाल आनंदम यांनी जिल्हा नृत्य परिषद कार्यकारिणी गठित केली. यावेळी नृत्य परिषद सहप्रमुख ऋषिकेश पोहनकर,सचिव विशाल क्रेग,कोषाध्यक्ष सचिन नारनवरे प्रामुख्याने उपस्थित होते.
.....
जिल्हा नृत्य परिषदेची कार्यकारिणी
गोंदिया जिल्हा नृत्य परिषद कार्यकारिणीचे अध्यक्ष म्हणून संजू यादव,सचिव इम्रान शेख, कोषाध्यक्ष विद्या धुर्वे, सहकोषाध्यक्ष सुनीता कुमार,सहसचिव निलेश सोनुले, देवरी तालुका उपाध्यक्षपदी आशिष ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे.