अवकाळी पावसाने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:30 IST2021-05-09T04:30:10+5:302021-05-09T04:30:10+5:30
मागील तीन चार दिवसांपासून सतत अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतात मोठ्या डौलाने धान पीक ...

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण ()
मागील तीन चार दिवसांपासून सतत अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतात मोठ्या डौलाने धान पीक बहरलेले आहे. वादळी वारा व पाऊस यामुळे काही शेतकऱ्यांच्या शेतातील धान पीक आडवे पडलेले आहे. लोंबीवरील धानाचे लोंब आहेत. त्यामुळेसुद्धा उत्पादन कमी होत आहे तसेच कापणी झालेल्या धानावर अवकाळी पावसामुळे कडपा पुन्हा वाढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
.....
माझ्या शेतात रब्बी हंगामात धान पिकांची लागवड केली आहे. यावर्षी कीटकनाशकांचा खर्च कमी आलेला असून, पीक समाधानकारक होते. मात्र मागील तीन चार दिवसांपासून अवकाळी पाऊस येत असल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला जाण्याची शक्यता बळावली आहे.
- श्रीराम भावे शेतकरी, इसापूर
.....
अर्जुनी-मोरगाव तालुक्यात रब्बी हंगामात सर्वत्र धान पिकाची लागवड केली आहे. यंदा रब्बी धानाचे पीकसुध्दा चांगले आहे. मात्र अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे हाती आलेले पीक वाया जाण्याची शक्यता आहे.
- केवल शेंडे, शेतकरी, इसापूर