राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:15 IST2021-01-13T05:15:10+5:302021-01-13T05:15:10+5:30
सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या छायाचित्रांचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी राजानी, ...

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी ()
सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या छायाचित्रांचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी राजानी, टेंभुर्णे व मेंढे यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित माहिती विद्यार्थ्यांना दिली. महापुरुषांचा आदर्श समोर ठेवून जीवनात त्यांच्या शिकवणुकीचा अंगीकार करावा असे सांगितले. मुख्याध्यापक मेश्राम यांनी, माँ जिजाऊंच्या शिकवणुकीचा अंगीकार करून लोकशाही मूल्य, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय अधिक वृध्दिंगत करावे. युवकांनी स्वामी विवेकानंद यांचा आदर्श घ्यावा. आपले ध्येय पूर्ण होईपर्यंत थांबू नका. एकाग्रता जीवनात आवश्यक आहे. विशिष्ट ध्येय निश्चित करण्यात आले तर यशस्वी होण्यासाठी मार्ग सोपा होईल, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमात, ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना थोर पुरुषांचे चरित्र, एक पेन व पेन्सिल भेट देण्यात आले. संचालन गिरेपुंजे यांनी केले. आभार डोंगरवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी आर.जी. पुस्तोडे, एन. आर. गिरेपुंजे, निंबेकर, सुनंदा मारबते यांनी सहकार्य केले.