अंकतला जगदीशकडून मिळाला देशी कट्टा

By Admin | Updated: October 23, 2016 01:49 IST2016-10-23T01:49:08+5:302016-10-23T01:49:08+5:30

गोंदियाच्या अंबाटोली परिसरात राहणाऱ्या अंकत भास्कर वैद्य (३२) आणि काजल मेश्राम (२८) यांच्या नवाटोला-

Ankata gets Jagdish's native Katta | अंकतला जगदीशकडून मिळाला देशी कट्टा

अंकतला जगदीशकडून मिळाला देशी कट्टा

पोलीस मागावर : पाच पानाच्या पत्रात वहीवर लिहून ठेवली व्यथा
गोंदिया : गोंदियाच्या अंबाटोली परिसरात राहणाऱ्या अंकत भास्कर वैद्य (३२) आणि काजल मेश्राम (२८) यांच्या नवाटोला-घिवारी येथील मृत्यूचा तपास करताना अंकतने तो कट्टा कुठून आणला याची माहिती पोलिसांपुढे आली आहे. त्याने मृत्यूपूर्वी आईच्या नावाने लिहून ठेवलेल्या चार ते पाच पानी पत्रात त्याने या कट्टयाचा उल्लेख केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गोंदियाच्या रेल्वेस्थानक परिसरात राहणाऱ्या जगदीश नावाच्या व्यक्तीकडे एकाने कट्टा असलेली पिशवी आणून सोडली व तो पुन्हा न परतल्यामुळे जगदीशने तो कट्टा आपल्याला दिल्याचे त्याने पत्रात म्हटले आहे. रेल्वेस्थानक परिसरात त्याचे बुक स्टॉल असल्याचेही त्या पत्रात त्याने नमूद केले आहे.
देशी कट्टे पुरविणाऱ्या माफीयापर्यंत पोहोचण्याची योजना पोलीस विभाग करीत आहेत. पोलिसांनी त्या कट्टयावर असलेले फिंगर प्रिन्ट घेतले असून तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात आले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहीलेली चिट्टी त्याचीच आहे किंवा नाही याची शहानिशा पोलिसांनी केली.
त्याचे दुसऱ्या वहीवरील अक्षर व चिट्टीचे अक्षर जुळले असल्याची माहिती पोलिसांना दिली.
पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या त्या दोन तरूणांना रावणवाडीत बोलावून त्यांचे बयान घेण्यात आले. ते गोंदियातच एकत्र शिकत होते. यूपीएससीचा अभ्यास करण्यासाठी आपण पुण्यात आहोत. काजलला आम्हमी बहीण मानत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. (तालुका प्रतिनिधी)

कॉल डिटेल्सवरून मिळाली माहिती
काजल आपल्या बहीणीसारखी असल्याचे पुण्यावरून आलेल्या सुयशचे म्हणणे आहे. मात्र या प्रकरणात आप्पाचा काय संबंध आहे, यासंदर्भात रावणवाडी पोलीस तपास करीत आहेत. पोलिसांनी काढलेल्या कॉल डिटेल्समध्ये बरीच माहिती पोलिसांना मिळाली असून त्या दिशेने तपास सुरू आहे.

Web Title: Ankata gets Jagdish's native Katta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.