अन् गावची शाळाची फाईल झाली ‘गहाळ’
By Admin | Updated: July 21, 2014 00:15 IST2014-07-21T00:15:30+5:302014-07-21T00:15:30+5:30
गोंदिया जिल्हा परिषदेतील लेखा व वित्त विभागाचा अनागोंदी कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. गावची शाळा आमची शाळाची फाईल गहाळ झाली आहे. त्यामुळे यावर्षीचे पुरस्कार वांद्यात आहेत.

अन् गावची शाळाची फाईल झाली ‘गहाळ’
कारवाई अटळ : आठवडाभराची मुदत
गोंदिया : गोंदिया जिल्हा परिषदेतील लेखा व वित्त विभागाचा अनागोंदी कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. गावची शाळा आमची शाळाची फाईल गहाळ झाली आहे. त्यामुळे यावर्षीचे पुरस्कार वांद्यात आहेत.
जिल्हा परिषदेने गुणवत्ता पुर्ण शिक्षण भौतिक सुविधेसह देण्यासाठी गावाची शाळा आमची शाळा अमंलात आणली. या उपक्रमांतर्गत काम करणाऱ्या शाळांना प्रभाग, तालुका व जिल्हास्तरावर पुरस्कार देण्याचे ठरविण्यात आले. या उपक्रमाची प्रचार-प्रसिध्दी देणाऱ्या बातमीदारांना तालुका व जिल्हास्तरावर पुरस्कार देण्याची योजना आखली. त्यासाठी सात लाख १३ हजार ५०० रुपये देण्याचे ठरले. मागील दोन महिन्यापासून ही फाईल गहाळ झाल्याने ‘ढुंडो- ढुंडो रे साजना’ ही स्थिती शिक्षण विभागात व लेखा विभागात झाली आहे. फाईल गहाळ झाल्यामुळे पुरस्कार अडले आहेत. शिक्षण विभागातून ही फाईल वित्त व लेखा विभागाकडे पाठविण्यात आली. त्या फाईलची आवक वित्त विभागात आहे. परंतु जावक वित्त विभागात नाही. परंतु वित्तविभाग आपली चूक लपविण्यासाठी ही फाईल शिक्षण विभागाला परत पाठविल्याचे बोलते. फाईल न मिळाल्यास येथील कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. येत्या आठवडाभरात ही फाईल न मिळाल्यास वित्त विभागातील कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही फाईल शोधण्यासाठी यवत्त व लेखा विभागाचे कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)