क्षेत्राच्या विकासकामासाठी सदैव प्रयत्नशील राहणार ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:31 IST2021-09-18T04:31:40+5:302021-09-18T04:31:40+5:30
देवरी : पालांदूर (जमी.) पंचायत समिती क्षेत्रामध्ये मगरडोह, टेकटी, बाळापूर, सुकळी, रामगड, रोपा, ढोढरा, सर्रेगाव, घोनाडी, चुटिया, पळसगाव, गरारटोला, ...

क्षेत्राच्या विकासकामासाठी सदैव प्रयत्नशील राहणार ()
देवरी : पालांदूर (जमी.) पंचायत समिती क्षेत्रामध्ये मगरडोह, टेकटी, बाळापूर, सुकळी, रामगड, रोपा, ढोढरा, सर्रेगाव, घोनाडी, चुटिया, पळसगाव, गरारटोला, धमदीटोला अशा आदिवासी दुर्गम गावाचा समावेश आहे. या गावांना देवरी तालुक्यातील घाटा खालचा भाग म्हणून ओळखला जातो. आजपर्यंत जे ही लोकप्रतिनिधी निवडून आले त्यांनी या क्षेत्राकडे दुर्लक्ष केले; पण आपण या क्षेत्राच्या विकासाकडे लक्ष देऊन कायापालट करू, असे प्रतिपादन आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.
तालुक्यातील पालांदूर (जमी.) येथे देवरी तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित काँग्रेस पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष रत्नदीप दहिवले, तालुकाध्यक्ष संदीप भाटिया, द्वारकाप्रसाद धरमगुळे, भुवन नरवरे, घोनाडीचे सरपंच सोनू नेताम, माजी सरपंच प्रेमचंद गुप्ता, संदीप कटकवार, सरपंच जयवंता हरदुले, फुलवंता बागडेरिया, नुरचंद नाईक, कुंती बोरुळे उपस्थित होते. मेळाव्या दरम्यान आमदार कोरोटे यांनी पालांदूर क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूृर व सर्वसामान्य जनतेचे समस्या ऐकून घेतल्या. यावेळी अनेक भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनू नेताम यांनी मांडले. संचालन राजीव भक्ता यांनी केले, तर आभार उपसरपंच नूरचंद नाईक यांनी मानले.