शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांकडून नेहमीच रेफर टू सालेकसाचा अवलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 05:00 IST

प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार सध्या एका खोलीतून सुरू आहे. या ठिकाणी आवश्यक असल्यास दाखल करण्याची वेळ आली की त्या रूग्णाला भरती करून प्राथमिक औषधोपचार करण्याऐवजी सालेकसा येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविले जाते. तर कधी कधी थेट गोंदियाला जाण्यासाठी सांगितले जाते. अशावेळी अनेकदा दरेकसा परिसरातील गंभीर आजाराच्या रुग्णाला गोंदियाला नेताना तो दगावल्याच्या घटना सुध्दा घडल्या आहेत.

ठळक मुद्देदरेकसाची आरोग्य सेवा ठप्प : रूग्णांना दाखल करण्याची सोय नाही, रेल्वे गेटमुळे समस्या

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसाचा संपुर्ण कारभार जमाकुडो येथील उपकेंद्रात सुरू आहे. या ठिकाणी सोयी सुविधेअभावी येथील डॉक्टर परिसरातील रूग्णांना नेहमी रेफर टू सालेकसाचा प्रयोग करतात. त्यामुळे अनेकदा गंभीर आजाराचा रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही.प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार सध्या एका खोलीतून सुरू आहे. या ठिकाणी आवश्यक असल्यास दाखल करण्याची वेळ आली की त्या रूग्णाला भरती करून प्राथमिक औषधोपचार करण्याऐवजी सालेकसा येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविले जाते. तर कधी कधी थेट गोंदियाला जाण्यासाठी सांगितले जाते. अशावेळी अनेकदा दरेकसा परिसरातील गंभीर आजाराच्या रुग्णाला गोंदियाला नेताना तो दगावल्याच्या घटना सुध्दा घडल्या आहेत. दरेकसा परिसर व या उपकेंद्रातील समाविष्ट गावे जंगलव्याप्त डोंगराळ आणि अतिदुर्गम भागातील आहेत. या गांवामध्ये राहणारे लोक मोलमजुरी करणारे किंवा वनोपज संकलन करून किंवा थोडीफार शेती व शेत मजुरी करून जीवन जगतात. आजारी पडले की ते जेमतेम प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचतात व आपल्याला मोफत आणि चांगला औषधोपचार मिळेल अशी अपेक्षा करतात. परंतु येथे येताच रूग्णांना त्वरीत भरती करून सलाईन, इंजेक्शन देत बेडची सोय व भरती करण्याऐवजी डॉक्टर थेट रेफर टू सालेकसाची पावती हातात देतात. गरीब आदिवासी लोक दरेकसा ते सालेकसापर्यंत १५ किलो मीटरचा प्रवास करून ग्रामीण रूग्णाला गाठण्यात अपयशी ठरतो. आरोग्य केंद्रात वाहन आहे परंतु तिचा उपयोग रूग्णांना नेण्यासाठी क्वचितच होतो. त्यात डिझेल भरण्याची वेळ रुग्णाच्या नातेवाईकावर येते. या शिवाय या भागात हिवतापाचे रूग्ण वर्षभर मिळतात. तसेच दूषित पाण्यामुळे उद्भवणारे रोग सुद्धा येथीला लोकांना नेहमी होतात. अशात त्यांना वेळेवर पुर्ण औषधोपचाराची नितांत गरज असते. परंतु अनेक सोयी अभावी येथे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही.रेल्वे गेटमुळे होतो विलंबदरेकसा हे गाव मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर असून या ठिकाणी असलेले रेल्वे स्थानका लगतच मुख्य मार्गावर रेल्वे गेट आहे. हा रेल्वे नेहमी बंद असतोे. या ठिकाणी अतिरिक्त प्लेटफॉर्म असल्याने एक्सप्रेस गाड्या पास करण्यासाठी तासनतास रेल्वे गेट बंद ठेवले जाते. अशा वेळी एखाद्या रुग्णालयात दाखल करण्याससाठी नेताना मोठी समस्या होते.आवश्यक आरोग्य कर्मचाऱ्यांचा अभावरात्री बेरात्री एखादा रूग्ण या आरोग्य केंद्रात आला की या ठिकाणी आवश्यक आरोग्य कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे औषधोपचार मिळत नाही. सोयी अभावी अनेक कर्मचारी येथे बाहर गावावरुन ये-जा करतात.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर