धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:33 IST2021-08-25T04:33:52+5:302021-08-25T04:33:52+5:30

गोंदिया : राज्यातील कोरोना परिस्थिती आता नियंत्रणात असल्याने राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत निर्बंध शिथिल केले असून, सर्वच व्यवहार ...

Allow religious places to open | धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी द्या

धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी द्या

गोंदिया : राज्यातील कोरोना परिस्थिती आता नियंत्रणात असल्याने राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत निर्बंध शिथिल केले असून, सर्वच व्यवहार व परिवहनाला परवानगी दिली आहे. मात्र, आजघडीला फक्त धार्मिक स्थळांनाच कुलपे लागली आहेत. अशात धार्मिक स्थळांना उघडण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भाविक व पुजाऱ्यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन खासदार प्रफुल्ल पटेल यांना पाठविले आहे.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट बघता एप्रिल महिन्यापासून लॉकडाऊन लावण्यात आले व पुन्हा एकदा धार्मिक स्थळांवर बंदी लावण्यात आली. मात्र, राज्यात कोरोना नियंत्रणात असल्याने राज्य शासनाने एसटी व रेल्वे प्रवासाला परवानगी दिली आहे. यामध्ये राज्य व परराज्यातील नागरिकांची गर्दी होत असून, कोरोना प्रादुर्भावाची शक्यता असतानाही प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर सर्वच व्यवहार व दुकानांनाही पूर्णपणे परवानगी देण्यात आली आहे. दुसरीकडे भाविक फक्त १-२ मिनिटांसाठी मंदिरात येत असतानाही सर्वच धार्मिक स्थळांवर बंदी लावण्यात आली आहे. यामुळे मंदिरावर आश्रित पुजारी, तसेच पूजेचे साहित्य विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. करिता अन्य व्यवहारांप्रमाणे आता धार्मिक स्थळांना उघडण्याची परवानगी देण्याची मागणी पंडित सुरेंद्र शर्मा, सुरेश राठोड, आनंद बघेल, ईश्वर नेचवानी, तुलसीदार परमार, हिरालाल बावनथडे, अभिजित असाटी, सुधीर अग्रवाल, विशाल मोदी यांनी केली आहे.

Web Title: Allow religious places to open