पालकमंत्र्यांच्या हस्ते वनहक्क पट्टे वाटप ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:32 IST2021-08-19T04:32:47+5:302021-08-19T04:32:47+5:30

नवाब मलिक यांच्या हस्ते देवरी तालुक्यातील आवरीटोला (गोटाबोडी) येथील ताराचंद नवलशा भोयर, आलेवाडा गावातील श्यामसिंग रामाधिन खुळसाम, टोयागोंदी येथील ...

Allocation of Forest Rights Leases by the Guardian Minister () | पालकमंत्र्यांच्या हस्ते वनहक्क पट्टे वाटप ()

पालकमंत्र्यांच्या हस्ते वनहक्क पट्टे वाटप ()

नवाब मलिक यांच्या हस्ते देवरी तालुक्यातील आवरीटोला (गोटाबोडी) येथील ताराचंद नवलशा भोयर, आलेवाडा

गावातील श्यामसिंग रामाधिन खुळसाम, टोयागोंदी येथील नामदेव पुनाराम आचले. तसेच अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ईळदा येथील बन्सी जल्दू कोल्हे, डोंगरवार गावातील जगन ऊर्फ जयेश बारसू गडपाल, सुकडी येथील दुधराम तुळशिराम घरतकर. तिरोडा तालुक्यातील कुलपा येथील बाळकृष्ण नत्थु परतेती. सडक-अर्जुनी तालुक्यातील दोडक (जांभडी) येथील धर्मदास चंभरु करस्कोले, शेंडा गावातील गणेश सुकल टेकाम व बाम्हणी येथील सदाराम तुळशीराम वट्टी यांना वनहक्क पट्टे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील मेंढे, आमदार डॉ.परिणय फुके, विनोद अग्रवाल, अभिजीत वंजारी, विजय रहांगडाले, सहेषराम कोरोटे, माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे, माजी आमदार राजेंद्र जैन,

जिल्हाधिकारी नयना गुंडे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, सहायक जिल्हाधिकारी अनमोल सादर, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पुराम, न.प.मुख्याधिकारी करण चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, प्रभारी उपजिल्हाधिकारी (सामान्य) लिना फलके, तहसीलदार आदेश

डफळ, अपर तहसीलदार अनिल खडतकर, समाज कल्याणचे सहायक आयुक्त डॉ. मंगेश वानखडे यांच्यासह इतर विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

Web Title: Allocation of Forest Rights Leases by the Guardian Minister ()