समाजकल्याणच्या तिन्ही शाळा होणार डिजिटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 06:00 IST2020-02-08T06:00:00+5:302020-02-08T06:00:24+5:30
अनुसूचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनेतील कामांना प्रशासकीय मान्यता देऊन अर्थसंकल्पीत निधी या शाळांना डिजीटल करण्यासाठी जिल्हाधिकारी गोंदिया यांनी दिला आहे. गोंदिया जिल्ह्यातील विशेष समाज कल्याण विभागाला नाविन्यपूर्ण योजनेकरीता ३ टक्के निधी म्हणजे १ कोटी ३० लाख ४४ हजार रूपये शासनाने मंजूर केले आहे.

समाजकल्याणच्या तिन्ही शाळा होणार डिजिटल
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत गोंदिया जिल्ह्यातील ३ शासकीय निवासी शाळा डिजीटल होत आहेत. त्यासाठी नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत ४० लाख ५५ हजार रूपये खर्च करण्यात आले आहेत.
अनुसूचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनेतील कामांना प्रशासकीय मान्यता देऊन अर्थसंकल्पीत निधी या शाळांना डिजीटल करण्यासाठी जिल्हाधिकारी गोंदिया यांनी दिला आहे. गोंदिया जिल्ह्यातील विशेष समाज कल्याण विभागाला नाविन्यपूर्ण योजनेकरीता ३ टक्के निधी म्हणजे १ कोटी ३० लाख ४४ हजार रूपये शासनाने मंजूर केले आहे. या पैशातूनन ४० लाख ५५ हजार रूपये गोंदिया जिल्ह्यात विशेष समाज कल्याण विभागाच्या जिल्ह्यात तीन शाळांना दिले आहे. त्या तिन्ही शाळा डिजीटल करण्यासाठी हा निधी देण्यात आला आहे. तिरोडा तालुक्याच्या सरांडी येथे असलेली मुलींची शासकीय निवासी शाळेला १३ लाख २५ हजार,सडक-अर्जुनी तालुक्याच्या डव्वा येथे असलेली मुलींची शासकीय निवासी शाळेला १३ लाख २५ हजार तर गोंदियाच्या नंगपूरा मूर्री येथे असलेली मुलांची शासकीय निवासी शाळेला १३ लाख २५ हजार रूपये देण्यात आलेत. तांत्रीक व्यवहार व तपासणीकरीता ७९ हजार ५०० रूपये दिले.मागावर्गीयांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शासनाने विशेष समाज कल्याणच्या जिल्ह्यात असलेल्या तिन्ही शाळा डिजीटल करण्यास सुरूवात केली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत ह्या सर्व शाळा डिजीटल होतील.
आकाशातील ग्रह ताऱ्यांच्या अभ्यासासाठी टेलिस्कोप
जिल्ह्यातील ह्या तिन्ही शाळांमधील विद्यार्थ्यांना आकाशातील ग्रहताºयांचा अभ्यास करता यावा ते पाहून विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राचा अभ्यास व्हावा यासाठी प्रत्येक शाळेला एक लाख रूपये किंमतीचा टेलिस्कोप देण्यात आला आहे. त्या टेलीस्कोपला विद्यार्थी हाताळतात.
आधुनिकीकरणाच्या काळात खासगी शाळांच्या तुलनेत समाज कल्याणच्या शाळा कुठेही मागे राहू नयेत यासाठी जिल्ह्यातील तिन्ही शाळा डिजीटल करणे सुरू आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत डिजीटल काम पूर्ण होणार आहे.
- मंगेश वानखेडे, समाज कल्याण उपायुक्त गोंदिया.