बालकामगार निर्मूलनासाठी सर्व समाजघटकांनी पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 05:00 AM2019-11-12T05:00:00+5:302019-11-12T05:00:01+5:30

बालमजुरी ही एक गंभीर समस्या असून तीची पायमुळे ही समाजात खोलवर रु तलेली आहेत. बहुतांश मुले बालमजुरीत गुंतल्याने त्यांचे शिक्षण, आरोग्य, विकास आणि भविष्यातील उदरनिर्वाह यावर गंभीर परिणाम होत आहे. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी बालमजुरी समुळ नष्ट करण्यासाठी व बालमजुरी निर्मुलनासाठी स्वयंसेवी संस्था तसेच सर्व समाज घटकांनी पुढाकार घेवून समन्वयाने काम करावे असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्र पवार यांनी केले.

All social organizations should take initiative to eliminate child labor | बालकामगार निर्मूलनासाठी सर्व समाजघटकांनी पुढाकार घ्यावा

बालकामगार निर्मूलनासाठी सर्व समाजघटकांनी पुढाकार घ्यावा

googlenewsNext
ठळक मुद्देमहेंद्र पवार : बालकामगार जनजागृत अभियानाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बालमजुरी ही एक गंभीर समस्या असून तीची पायमुळे ही समाजात खोलवर रु तलेली आहेत. बहुतांश मुले बालमजुरीत गुंतल्याने त्यांचे शिक्षण, आरोग्य, विकास आणि भविष्यातील उदरनिर्वाह यावर गंभीर परिणाम होत आहे. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी बालमजुरी समुळ नष्ट करण्यासाठी व बालमजुरी निर्मुलनासाठी स्वयंसेवी संस्था तसेच सर्व समाज घटकांनी पुढाकार घेवून समन्वयाने काम करावे असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्र पवार यांनी केले.
राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागामार्फत ७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर कालावधीत बालकामगार जनजागृती मोहिमेच्या उद्देशातून गुरूवारी (दि.७) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बालकामगार जनजागृती अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरकारी कामगार अधिकारी गुणवंत पंधरे, नमाद महाविद्यालयाचे प्राध्यापक रु तु तुरकर, सामाजिक कार्यकर्ता डॉ.सविता बेदरकर प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविकातून पंधरे यांनी, संपूर्ण अभियानाची उपस्थितांना माहिती दिली. तसेच प्रकल्पांतर्गत बालकामगार मुलांना कोणत्या सोयी-सुविधा तसेच त्यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या कार्यक्र म व राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाची माहिती दिली. तसेच बालकामगारांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याकरीता आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे मत मांडले. तुरकर यांनी, लहान मुलांना कामावर ठेवणे हा कायदेशीर गुन्हा आहे. ही बाब सर्वांच्या लक्षात येणे आवश्यक आहे असे सांगितले. डॉ.बेदरकर यांनी, बालकामगार विषयावरती व बालकामगार प्रथा दूर करण्याकरीता प्रत्येकाने आपली जबाबदारी म्हणून कार्य करावे असे सांगितले.
संचालन प्रकल्प संचालक महेंद्र रंगारी यांनी केले. आभार कार्यक्र म व्यवस्थापक नितीन डबरे यांनी मानले. कार्यक्र माला शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, नगरपरिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सामाजिक न्याय विभाग, जिल्हा महिला बाल विकास तसेच जिल्हा बालसंरक्षण अधिकारी यांच्या कार्यालयातील कर्मचारी तसेच सहायक कामगार आयुक्त व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शेवटी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

Web Title: All social organizations should take initiative to eliminate child labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.