शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये दारुची तस्करी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 05:00 IST

अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करीत असलेली पांढऱ्या रंगाची टोयाटो क्वालीस चार चाकी वाहन अर्जुनी-मोरगाव पोलीसांनी पकडले. पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दाभना रोडवर सोमवारी (दि.३०) रात्री १० वाजता ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दोघा जणांना ताब्यात घेऊन चारचाकी वाहनासह १ लाख ९ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ठळक मुद्देलाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त: अर्जुनी मोरगाव पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : सध्या सर्वत्र कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आहे. यावर आळा बसावा म्हणून सर्वत्र संचारबंदी असून लॉकडाऊन सुरू आहे. अशाही परिस्थितीमध्ये दारूची तस्करी करणारे गप्प बसताना दिसत नाही. अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करीत असलेली पांढऱ्या रंगाची टोयाटो क्वालीस चार चाकी वाहन अर्जुनी-मोरगाव पोलीसांनी पकडले. पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दाभना रोडवर सोमवारी (दि.३०) रात्री १० वाजता ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दोघा जणांना ताब्यात घेऊन चारचाकी वाहनासह १ लाख ९ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली असून १५ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यामुळे व्यवहार ठप्प पडले आहेत.अशामध्ये दाम दुप्पटीने पैसा घेऊन दारू विक्री करण्यासाठी दारूची तस्करी करणारे नवनवीन शक्कल वापरतात. अर्जुनी-मोरगाव येथील दाभना रोडवरील साईनाथ पेट्रोल पंप समोरील रस्त्यावर एक पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी उभी असून त्यात दारूच्या पेट्या आहेत. अशी गुप्त माहिती एका खबऱ्याकडुन सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत भुरे यांना मिळाली. पोलीस निरीक्षक महादेव तोंदले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत भुते, पोलीस शिपाई राहुल चिचमलकर,महेंद्र सोनवाने, श्रीकांत मेश्राम घटनास्थळी गेले असता टोयाटो क्वालीस एमएच ३१/एएच-३०७० चारचाकी वाहन उभे होते.त्यात दोघेजण बसले होते. गाडीची तपासणी केली असता त्यात देशी दारू संत्री नावाची लेबल असलेले ४५ नग (७५० एमएल) आढळून आले.विना परवाना देशी दारु बाळगल्यावरून तेजाबसिंग कचनसिंग रामगडे (२६ वर्ष), राजू रामदास कोटरंगे (३७ वर्ष) दोन्ही राहणार लाखांदूर यांना ताब्यात घेण्यात आले. ९ हजार ७२० रूपयांची देशी दारू व १ लाख रूपयाची चारचाकी वाहन असा मुद्देमाल जब्त करून सदर आरोपी विरोधात कलम ६५(ई),७७(अ),८३ मदाका अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास ठाणेदार तोंदले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत भुते करीत आहेत.

टॅग्स :alcohol prohibition actदारुबंदी कायदा