अकोला येथील दोघे आमगाव पोलिसांच्या ताब्यात

By Admin | Updated: August 3, 2014 23:27 IST2014-08-03T23:27:15+5:302014-08-03T23:27:15+5:30

नकली नोटा चलनात आणणाऱ्या अकोला येथील दोघांना आमगाव पोलिसांनी चौकशीसाठी आपल्या ताब्यात घेतले आहे. शिवाजी गणपत भुतेकर (२८) रा. देगाव ता.बिसोड जि. अकोला, मनोज दीपक पवार

Akola is in possession of the Amgaon police | अकोला येथील दोघे आमगाव पोलिसांच्या ताब्यात

अकोला येथील दोघे आमगाव पोलिसांच्या ताब्यात

नकली नोट प्रकरण : मुख्य आरोपीला हृदयविकाराचा झटका
गोंदिया : नकली नोटा चलनात आणणाऱ्या अकोला येथील दोघांना आमगाव पोलिसांनी चौकशीसाठी आपल्या ताब्यात घेतले आहे. शिवाजी गणपत भुतेकर (२८) रा. देगाव ता.बिसोड जि. अकोला, मनोज दीपक पवार (२७) रा. गंगानगर एम पी गार्डन हॉटेलच्या मागे अकोला अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
आमगाव येथील नैवेद्यम रेस्टॉरेंटचे मालक प्रल्हाद सुरेशप्रसाद दुबे (५०) व नवीन कृष्णकुमार असाटी (२६), दोघेही रा.आमगाव या दोघांनी मागील अनेक दिवसांपासून नकली नोटा चलनात आणण्याचा व्यवसाय सुरु केला होता. याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली व आमगाव पोलिसांनी ५ जुलैच्या सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास सापळा रचून येथील बाजार चावडी येथे त्या दोघांना संशयास्पद हालचाली करताना पकडले. त्यांची अंगझडती घेतल्यावर दोघांजवळून ५०० रुपयांच्या ३४ नकली नोटा हस्तगत करण्यात आल्या. त्यात प्रल्हाद दुबेजवळ ११ नोटा (सिरीज क्रमांक ५ डीडी ५९८७८८) व ९ नोटा (सिरीज क्रमांक ९ बीके ९७६६५९) या एकाच सिरीजच्या आढळल्या तर नवीन असाटी याच्याकडे असलेल्या १४ नोटांपैकी ८ नोटा (५ डीडी ५९८७८८), ३ नोटा (९ बीके ९७६६५९) व ६ नोटा (४ एचजी ५८६३७४) या सिरीजच्या आहेत. १७ हजार रुपयांच्या ३४ नकली नोटा पोलिसांनी हस्तगत केल्या.
त्यांच्याविरूध्द भादंविच्या कलम ४८९ ब, ४८९ क, १२० ब अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्यांंनी पोलीस कोठडीत अकोला येथे अटक झालेल्या तिघांची माहिती दिली होती. यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्या दोघांना न्यायालयाने ६ आॅगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी दीपक पवार याला ह्दयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे त्याला तुरूंगातील रूग्णालयात ठेवण्यात आले आहे.
या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन पवार करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Akola is in possession of the Amgaon police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.