नाल्याच्या पाण्यातून केली जातेय शेती
By Admin | Updated: February 9, 2015 23:15 IST2015-02-09T23:15:12+5:302015-02-09T23:15:12+5:30
शहरातली घाण घेऊन जात असलेल्या नाल्याच्या पाण्यातून शेती केली जात असल्याचा प्रकार शहरातील वसंतनगर परिसरात सुरू आहे. यामुळे मात्र या परिसरात दुर्गंधी व डासांचा

नाल्याच्या पाण्यातून केली जातेय शेती
उग्र आंदोलनाचा इशारा : वसंतनगरवासीयांचे आरोग्य धोक्यात
गोंदिया : शहरातली घाण घेऊन जात असलेल्या नाल्याच्या पाण्यातून शेती केली जात असल्याचा प्रकार शहरातील वसंतनगर परिसरात सुरू आहे. यामुळे मात्र या परिसरात दुर्गंधी व डासांचा त्रास फोफावला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हा प्रकार त्वरीत थांबविण्यात यावा यासाठी वसंतनगरातील महिला व पुरूष ८ फेब्रुवारी रोजी रस्त्यावर उतरले. नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांना हा संपूर्ण प्रकार दाखवून त्वरीत थांबविण्याची मागणी केली.
वसंतनगरातील भरतदास वैष्णव यांच्याकडे १२ एकर शेती असून ते शेतीच्या सिंचनासाठी बोअर किंवा विहीरीची सोय न करता शेताला लागून जात असलेल्या नाल्याचे पाण़ी वापरत आहेत. नाल्यातल्या पाण्याने शेतीचे सिंचन केले जात असल्यामुळे मात्र परिसरात डास व दुर्गंध फोफावली आहे. शिवाय अशा दुषीत वातावरणामुळे आजारांचा जोर बळावण्याची दाट शक्यता असून नागरिक भितीत जीवन जगत आहेत. ८ फेब्रुवारी रोजी येथील नागरिकांच्या सहनशिलतेचा बांध अखेर फुटला व त्यांनी घराबाहेर पडून या समस्येवर तोडगा काढण्याचे ठरविले.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालून सुरू असलेला हा प्रकार दाखविण्यासाठी त्यांनी नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांना बोलाविले. नगराध्यक्ष जायस्वाल व नगरसेविका शोभा चौधरी यांचे प्रतिनिधी हरी चौधरी घटनास्थळी आले असता त्यांना संपूर्ण प्रकार दाखवून यावर त्वरीत कारवाई करण्याची मागणी वसंतनगरवासीयांनी केली. विशेष म्हणजे या प्रकारासाठी येथील नागरिकांनी यापूर्वीही जिल्हाधिकारी, पोलीस व आरोग्य विभागाकडे लेखी तक्रार दिली होती. मात्र त्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही. उलट वैष्णव यांना त्यानंतर अधिकच बळ मिळाले व त्यांनी नाल्याच्या पाण्यातूनच शेतीचे सिंचन करण्याचा सपाटा सुरू केला. आता मात्र वसंतनगरवासीयांच्या डोक्यावरून पाणी जात असल्याने नाल्याच्या पाण्यातून होत असलेली शेती बंद करण्याची, जागा शासनाने ताब्यात घेवून लहान मुलांसाठी बाग तयार करण्याची मागणी केली. मागण्यांची पूर्तता न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा नंदा राऊत, ईश्वरी रेड्डी, नंदीनी राव, रमेश मेंदे, पंकज पारधी, देवीलाल पारधी, एच.आर.बोपचे, वर्षा सुखदेवे, शकर चव्हाण, इंदू गजभिये, प्रशांत राणे, तुळसाबाई उके, डिंपल वाकडे, चंद्रकला उईके, बिमला सिन्हा, अनिता मेंढे, चंदा डडसेना, निलम खोटेले, मोहीत डडसेना, सरीता ब्राम्हणकरसह परिसरातील नागरिकांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)