शेतकऱ्यांना दिल्या शेती विषयक टिप्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST2020-03-03T05:00:00+5:302020-03-03T05:00:16+5:30
उद्घाटनजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपविभागीय कृषी अधिकारी भीमाशंकर पाटील होते. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, कृषी विज्ञान केंद्र हिवराचे खेडीकर, अंकुर सिड्स प्रा.लि.नागपूर येथील संशोधन विभागाचे तांत्रिक अधिकारी संकेत सुर्यपुजारी, गोरेगावचे तज्ज्ञ प्रशिक्षक ललीत रहांगडाले, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) सुनील खडसे, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक शैलेश बिसेन, अंकुर सिड्सचे मार्केटींग अधिकारी गौतम, डावू डूपांड लिमी.चे डेव्हलपमेंट मॅनेजर मनोज बघेले उपस्थित होते.

शेतकऱ्यांना दिल्या शेती विषयक टिप्स
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) तथा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने २७ फेब्रुवारी रोजी जिल्हा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण उच्च तंत्रज्ञान भाजीपाला लागवड व सेंद्रीय शेती या विषयावर प्रशिक्षण घेण्यात आले.
उद्घाटनजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपविभागीय कृषी अधिकारी भीमाशंकर पाटील होते. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, कृषी विज्ञान केंद्र हिवराचे खेडीकर, अंकुर सिड्स प्रा.लि.नागपूर येथील संशोधन विभागाचे तांत्रिक अधिकारी संकेत सुर्यपुजारी, गोरेगावचे तज्ज्ञ प्रशिक्षक ललीत रहांगडाले, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) सुनील खडसे, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक शैलेश बिसेन, अंकुर सिड्सचे मार्केटींग अधिकारी गौतम, डावू डूपांड लिमी.चे डेव्हलपमेंट मॅनेजर मनोज बघेले उपस्थित होते.
याप्रसंगी घोरपडे यांनी, शेतकऱ्यांशी संवाद साधत धान व भाजीपाला पिकांवरील शत्रु किड व मित्र किड यावर तसेच ठिबक व तुषार सिंचन यावर मार्गदर्शन केले. पाटील यांनी परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत सेंद्रीय शेती भाजीपाला लागवड तसेच शेतकºयांनी भात पिकाव्यतिरिक्त भाजीपाला व कडधान्य पिके घेवून शेतकºयांचे आर्थिक उत्पन्न कसे वाढेल यावर मार्गदर्शन केले. धनराज तुमडाम यांनी कृषि विभागाच्या विविध योजना तसेच फळबाग लागवड, तांत्रिक पध्दतीने धान लागवड यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
दुसºया सत्रात, उच्च तंत्रज्ञान भाजीपाला लागवड या विषयावर संकेत सुर्यपुजारी यांनी, शेडनेट हाऊस, पॉली हाऊसमध्ये भाजीपाला लागवड व भाजीपाल्याच्या विविध प्रजाती यावर सविस्तर माहिती दिली. खेडीकर यांनी माती परीक्षण व सुक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. रहांगडाले यांनी सेंद्रीय शेती या विषयावर विस्तृत माहिती दिली. बिसेन यांनी गांडूळ खतावर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मांडून संचालन सुनील खडसे यांनी केले. आभार शैलेश बिसेन यांनी मानले.