रंगकर्मी कलावंतांचे तीन टप्प्यात होणार आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:29 IST2021-07-29T04:29:32+5:302021-07-29T04:29:32+5:30

तिरोडा : आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य पातळीवर रंगकर्मी कलावंत तीन टप्प्यात आंदोलन करणार आहेत. कलावंतांच्या मागण्यांची शासनाने ...

The agitation of Rangkarmi artists will take place in three phases | रंगकर्मी कलावंतांचे तीन टप्प्यात होणार आंदोलन

रंगकर्मी कलावंतांचे तीन टप्प्यात होणार आंदोलन

तिरोडा : आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य पातळीवर रंगकर्मी कलावंत तीन टप्प्यात आंदोलन करणार आहेत. कलावंतांच्या मागण्यांची शासनाने दखल घ्यावी यासाठी शिष्टमंडळाच्यावतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना निवेदन देण्यात आले.

कोरोना काळात काम बंद असल्यामुळे रंगकर्मी कलावंतांवर बेरोजगारीची समस्या ओढवली. लोककला सादर करणारे तथा सोबतच ऑर्केस्ट्रा, नाटक, सिनेमा आदि कला क्षेत्रातील सर्व सोबत्यांना रंगकर्मी कलावंत म्हटले जाते. गोंदिया जिल्ह्यातील कलावंत मंडळाने महाराष्ट्र राज्य शासन व लोकप्रतिनिधी यांना निवेदन दिले आहे. यावेळी रंगकर्मी आंदोलनाचे संघटक दिलीप कोसरे व अतुल सतदेवे यांनी रंगकर्मी कलावंतांच्या समस्या व मागण्यांबाबत पटोले यांच्याशी चर्चा केली. यावेळी सरस्वती संगीत समूहाचे तिलक दीप, राजू सोनी, महेश लांजेवार, प्रसिद्ध तबला वादक पराग मेश्राम, नीरज रहांगडाले उपस्थित होते.

Web Title: The agitation of Rangkarmi artists will take place in three phases