अग्रवाल यांनी सांभाळला पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 22:14 IST2017-09-15T22:13:32+5:302017-09-15T22:14:05+5:30
विधान मंडळाच्या लोकलेखा समितीच्या प्रमुखपदी आमदार गोपालदास अग्रवाल यांची फेरनिवड करण्यात आली.

अग्रवाल यांनी सांभाळला पदभार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विधान मंडळाच्या लोकलेखा समितीच्या प्रमुखपदी आमदार गोपालदास अग्रवाल यांची फेरनिवड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी पदभार सांभाळला.
लोकलेखा समितीच्या प्रमुखपदी आमदार अग्रवाल आधी सुध्दा पदारुढ होते. दरम्यान समितीची नव्याने निवड करण्यात आल्याने विरोधी पक्ष नेता डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिफारसवरून त्यांची समितीच्या प्रमुखपदी फेरनिवड करण्यात आली. तसेच सर्वच राजकीय पक्षांनी समितीत संबधीत पक्षांच्या काही सदस्यांच्या जागी नव्या सदस्यांची नियुक्ती केली आहे. या समितीने आमदार अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली पदभार सांभाळला.
नवनियुक्त समितीची बैठक विधानभवनाच्या सभागृहात विधानसभा अध्यक्ष हरी बागडे, विधानपरिषद सभापती रामराजे नाईक, नवनियुक्त समिती सदस्य दिलीप वळसे पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, सुधाकर देशमुख, राजेंद्र पाटनी, अतुल भातखडकर, योगेश सागर, डॉ.सुनील देशमुख, प्रशांत ठाकूर, संजय केळकर, सुरेश धानोरकर, अजय चौधरी, शंभूराज देसाई, सत्यजीत पाटील, अब्दूल सत्तार अब्दूल नबी, विरेंद्र जगताप, संजय सावकारे, रवींद्र फाटक, हेमंत टकले, भाई जगताप, विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, उपसचिव मेघना तडेकर, रितूराज कुळतकर, अव्वर सचिव सोमनाथ सानप, महालेखाकार कार्यालयाच्या प्रधान महालेखाकार संगीता चौरे, उपमहालेखाकार कार्यालयाचे वरिष्ठ उपमहालेखाकार जी.के.पारडीकर, वित्त विभागाच्या प्रधान सचिव वंदना कृष्णांच्या उपस्थितीत घेण्यात आली. याप्रसंगी लोकलेखा समितीशी संबंधीत अधिकारी आणि विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.