शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा दोन कोरोना बाधित झाले कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:01 IST

गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्वॅब नमुने तपासणी प्रयोगशाळा सुरू झाल्यानंतर स्वॅब नमुने तपासणीचे प्रमाण वाढविण्यात आले आहे.येथील प्रयोगशाळेत दररोज १२० स्वॅब नमुने तपासणीची सुविधा आहे.त्यामुळे ८ जूनपासून स्वॅब नमुने तपासणीचे प्रमाण देखील वाढविण्यात आले आहे.

ठळक मुद्देसलग पाचव्या दिवशी कोरोना बाधित रुग्णांची नोद नाही : जिल्ह्यात आता ३० कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील पाच दिवसात नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली नाही. तर सोमवारी (दि.२२) पुन्हा दोन कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात आता केवळ ३० अ‍ॅक्टीव्ह कोरोना बाधित असून त्यांच्यावर गोंदिया जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे.गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्वॅब नमुने तपासणी प्रयोगशाळा सुरू झाल्यानंतर स्वॅब नमुने तपासणीचे प्रमाण वाढविण्यात आले आहे.येथील प्रयोगशाळेत दररोज १२० स्वॅब नमुने तपासणीची सुविधा आहे.त्यामुळे ८ जूनपासून स्वॅब नमुने तपासणीचे प्रमाण देखील वाढविण्यात आले आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत एकूण १९०८ जणांच्या स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात १०२ नमुने कोरोना बाधित आढळले.तर १७१५ स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. तर आतापर्यंत एकूण ७२ रुग्ण कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहेत.तर ९१ स्वॅब नमुन्याचा अहवाल गोंदिया प्रयोगशाळेकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त व्हायचा आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण होण्याचे प्रमाण चांगले असल्याने आतापर्यंत ७२ रुग्ण बरे होवून घरी परतले आहे. त्यामुळे निश्चित ही जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे.जिल्ह्यातील विविध शाळा आणि संस्थामधील क्वारंटाईन कक्षात ७९३ तर होम क्वारंटाईन १९३५ असे एकूण २७२८ जण क्वारंटाईन असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी सांगितले.जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याला ब्रेक लागल्याने निश्चितच जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. जिल्हा आरोग्य विभागाने सुध्दा यासाठी आता उपाययोजना सुरू केल्या आहेत.आरोग्य सेतू अ‍ॅप आणि सर्वेक्षणाची मदतजिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये, त्याला वेळीच प्रतिबंध लागावा यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात आहे. यासाठी आरोग्य विषयक सर्वेक्षण तसेच आरोग्य सेतू अ‍ॅपची मदत घेतली जात आहे.विदेशातून येणाऱ्या थेट क्वारंटाईनतिरोडा तालुक्यातील तीनशेवर नागरिक दुबई येथे रोजगारासाठी गेले होते. मात्र कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने ते रोजगारासाठी गेलेले नागरिक आता आपल्या स्वगृही परतत आहे. मागील दहा ते बारा दिवसांच्या कालावधी जिल्ह्यात दीडशेवर नागरिक जिल्ह्यात परतले आहे. तर रविवारी (दि.२१) रात्री सुध्दा काही नागरिक दुबईहून परतले असून त्यांना थेट क्वारंटाईन करुन त्यांचे स्वॅब नमुने तपासणी केले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यास मदत होत आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या