शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
IPL 2026: अभिषेक-हेडची वादळी खेळी; क्लासेनचा क्लास! SRH नं घरच्या मैदानावर MI ला दिला पराभवाचा धक्का
4
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
5
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
6
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
7
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
8
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
9
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
10
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
11
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
13
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
14
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
15
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
16
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
17
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
18
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा सहा कोरोना बाधीत कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 05:00 IST

ग्रीन झोनमध्ये असलेल्या गोंदिया जिल्ह्यात तब्बल ३९ दिवस कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू होते. मात्र १९ मे रोजी जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आणि दहा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या ६७ वर पोहचली. कोरोना बाधीतांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने आणि हे सर्व ग्रामीण भागातील असल्याने जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

ठळक मुद्देजिल्हावासीयांना दिलासा : चार दिवसात ४४ जण कोरोनामुक्त, आता २३ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने जिल्हावासीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र मागील ११ दिवसांच्या कालावधीत प्रथमच सोमवारी (दि.१) एकही नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही. तर सहा कोरोना बाधीत रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे सोमवारचा दिवस जिल्हावासीयांसाठी दिलासादायक ठरला. आत्तापर्यंत एकूण ४४ जण कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्यात आता २३ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहेत.ग्रीन झोनमध्ये असलेल्या गोंदिया जिल्ह्यात तब्बल ३९ दिवस कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू होते. मात्र १९ मे रोजी जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आणि दहा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या ६७ वर पोहचली. कोरोना बाधीतांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने आणि हे सर्व ग्रामीण भागातील असल्याने जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मुंबई, पुणे आणि रेड झोन क्षेत्रातून आलेल्या नागरिकांमुळेच जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला. याला काही प्रमाणात प्रशासनाचा दुर्लक्षितपणा सुध्दा कारणीभूत ठरला. सुरूवातील दोन असणारी कोरोना बाधीतांची संख्या ३१ मे पर्यंत ६७ वर पोहचली. ही जरी चिंता वाढविणारी बाब असली तरी एकूण कोरोनाबाधीत रुग्णांपैकी ३८ जण रविवारपर्यंत कोरोनामुक्त झाले. तर सोमवारी पुन्हा सहा कोरोना बाधीत कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ४४ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता केवळ २३ अ‍ॅक्टीव्ह कोरोना बाधीत आहे. त्यामुळे निश्चितच ही बाब जिल्हावासीयांना थोडा दिलासा देणारी आहे.कोरोना बाधीत रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. सोमवारी कोरोनामुक्त झालेले सहाही जण हे गोंदिया तालुक्यातील आहेत. यासर्वांवर गोंदिया जिल्हा क्रीडा संकुल येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू होता. कोरोना बाधीत रुग्ण होण्याचे प्रमाण चांगले असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण थोडा कमी होत आहे. शिवाय जिल्हावासीयांना सुध्दा दिलासा मिळाला आहे.११ दिवसात प्रथमच नवीन रुग्णाची नोंद नाहीजिल्ह्यात १९ मे पासून सातत्याने कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत होती. त्यामुळे केवळ दहा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा ६७ वर पोहचला होता. मात्र सोमवारी जिल्ह्यात एकही नवीन कोरोना बाधीत रुग्णाची नोंद झाली नाही. त्यामुळे जिल्हावासीयांसाठी निश्चितच ही दिलासा देणारी बाब आहे.

प्रयोगशाळेत आजपासून स्वॅबचे ट्रायल सुरूयेथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली आहे. तसेच सर्व यंत्रसामुग्री सुध्दा आली असून मंगळवारपासून (दि.२) येथील प्रयोगशाळेत स्वॅब नमुने तपासणीचे ट्रायल सुरू करण्यात येणार आहे. एम्स व आयसीएमआरकडून परवानगी मिळताच गोंदिया येथेच स्वॅब नमुने तपासले जातील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या