वहिनीला मारहाण केल्यानंतर दिराने घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:27 AM2021-05-15T04:27:25+5:302021-05-15T04:27:25+5:30

अरुण ठाकरे याच्या आई व वहिनीचे घरी भांडण झाले. त्यामुळे तो घरून निघून गेला. शेतात जाऊन मोहफुलाच्या झाडाला दोरीने ...

After beating his daughter-in-law, Dira strangled him | वहिनीला मारहाण केल्यानंतर दिराने घेतला गळफास

वहिनीला मारहाण केल्यानंतर दिराने घेतला गळफास

Next

अरुण ठाकरे याच्या आई व वहिनीचे घरी भांडण झाले. त्यामुळे तो घरून निघून गेला. शेतात जाऊन मोहफुलाच्या झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना १२ मे रोजी सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० वाजता दरम्यान घडली. अरुणच्या वहिनीने मोटारपंप सुरू करून पाणी भरण्यास सुरुवात केली असता विद्युत बिल जास्त येते, वारंवार मोटारपंप का सुरू करतेस? म्हणून अरुणने आपल्या वहिनीला मारहाण केली. मारहाण केल्यानंतर तो आत्महत्या करण्यास गेला तर त्याची वहिनी तक्रार देण्यासाठी तिराेडा पोलिसात गेली. बराच वेळ होऊनही अरुण परत न आल्यामुळे त्याच्या पत्नीने सासरा व आपल्या भावासह पतीचा शोध घेतला. दरम्यान, शेतातील मोहफुलाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याचे लक्षात आले.

Web Title: After beating his daughter-in-law, Dira strangled him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.