बेवारस बॅगने अडविली गोंडवाना एक्स्प्रेस

By Admin | Updated: July 30, 2015 01:35 IST2015-07-30T01:35:47+5:302015-07-30T01:35:47+5:30

रेल्वे मार्गालगत पडून असलेल्या एका बॅगने बुधवारी दुपारी रेल्वे प्रशासनासह पोलिसांची चांगलीच भंबेरी उडविली.

Adwando Gondwana Express, unavailable | बेवारस बॅगने अडविली गोंडवाना एक्स्प्रेस

बेवारस बॅगने अडविली गोंडवाना एक्स्प्रेस

नक्षल्यांची भीती : दीड तास तपासणी
दरेकसा : रेल्वे मार्गालगत पडून असलेल्या एका बॅगने बुधवारी दुपारी रेल्वे प्रशासनासह पोलिसांची चांगलीच भंबेरी उडविली. यामुळे रायपूरकडे जाणारी गोंडवाना एक्स्प्रेस दीड तास दरेकसा रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आली. मात्र त्या बॅगमध्ये काहीच संशयास्पद न निघाल्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सध्या नक्षल्यांचा शहीद सप्ताह सुरू असल्यामुळे ही दक्षता यंत्रणेने घेतली.
प्राप्त माहितीनुसार, दरेकसा स्थानकापासून पूर्वेकडे (डोंगरगड मार्ग) साधारण दीड किलोमीटर अंतरावर रेल्वेरूळालगत एक काळी बॅग संशयास्पदरीत्या ठेवलेली असल्याचे एका मालगाडीच्या चालकाला दिसले. त्याने लगेच याबाबतची माहिती दरेकसा स्थानकात दिली. रेल्वे प्रशासनाने पोलिसांना पाचारण करून घटनास्थळ गाठले आणि त्या बॅगची तपासणी केली. (वार्ताहर)

Web Title: Adwando Gondwana Express, unavailable