केशोरी परिसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:46 IST2021-02-05T07:46:10+5:302021-02-05T07:46:10+5:30
तर, नितीन प्राथमिक शाळेतील ध्वजारोहण मुख्याध्यापक नाजूक शेंडे यांच्या हस्ते, समर्थ आदिवासी आश्रमशाळेतील ध्वजारोहण प्राचार्य रामृू लंजे यांच्या हस्ते ...

केशोरी परिसर
तर, नितीन प्राथमिक शाळेतील ध्वजारोहण मुख्याध्यापक नाजूक शेंडे यांच्या हस्ते, समर्थ आदिवासी आश्रमशाळेतील ध्वजारोहण प्राचार्य रामृू लंजे यांच्या हस्ते पार पडले. ध्वजारोहण आटोपल्यानंतर शालेय सभेचे आयोजन नवोदय हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातील रंगमंचावर केले होते. अध्यक्षस्थानी नवोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दादा शेंडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य अशोक हलमारे, माजी बांधकाम सभापती प्रकाश पाटील गहाणे, माजी जि. प. सदस्य तेजुकला गहाणे, पं.स.सदस्य अर्चना राऊत, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य बाला मोहतुरे, मधुकर देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून सेवानिवृत्त झालेले मधुकर देशमुख आणि चरण चेटुले यांचा संस्थेच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन मनोहर पाऊलझगडे यांनी केले. तर प्रा. हिवराज साखरे यांनी आभार मानले.