निर्मलग्राम योजनेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:16 IST2021-01-13T05:16:16+5:302021-01-13T05:16:16+5:30
केशोरी : महाराष्ट्र शासनाने हागणदारी गाव अभियान राबवून केशोरी परिसरातील अनेक गावांना निर्मलग्राम योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या ग्रामपंचायतींना अतिरिक्त ...

निर्मलग्राम योजनेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष()
केशोरी : महाराष्ट्र शासनाने हागणदारी गाव अभियान राबवून केशोरी परिसरातील अनेक गावांना निर्मलग्राम योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या ग्रामपंचायतींना अतिरिक्त विकास निधीसह रोख पारितोषिक दिले परंतु निर्मलग्राम अंतर्गत बहाल केलेल्या गावांची स्थिती बघता या योजनेकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरातील अनेक गावांना हागणदारीमुक्त गाव अभियानांतर्गत निर्मलग्राम घोषित करुन लाखो रुपयांची बक्षिसे शासनाकडून प्रदान केली गेली. ग्रामपंचायतीमार्फत गावागावात शौचालये बांधण्यात आली. शौचालयाचा नियमित वापर करावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कलापथकांच्या माध्यमातून जनजागृतीसुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात आली. उघड्यावर शौचास जाणे बंद व्हावे यासाठी तालुकास्तरावर गाव पातळीवर गुडमार्निंग पथकांची निर्मिती करून उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईदेखील करण्यात आली. ही मोहीम सुरू होती तोपर्यंत उघड्यावर शौचास जाणे नागरिकांनी बंद केले होते. मात्र अलीकडे या परिसरातील गावातून फेटफटका मारला असता अनेक नागरिक शौचालय असूनही गावालगत असलेल्या रस्त्यावर शौचास बसलेले दृष्टीस पडत आहेत. याकडे मात्र निर्मलग्राम पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायत प्रशासनाचे हेतुपुरस्पर दुर्लक्ष होताना दिसत आहे. परिणामी गावातील रस्त्यांवर दुर्गंधी पसरली आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन वर्षभर जनजागृती करण्याची गरज आहे.