जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढे यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:46 IST2021-02-05T07:46:23+5:302021-02-05T07:46:23+5:30
आमगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपला एक परिवार आहे. त्यामुळे परिवार संवाद दौऱ्याच्या माध्यमातून आपण कार्यकर्त्यांच्या भेटीला आलो ...

जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढे यावे
आमगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपला एक परिवार आहे. त्यामुळे परिवार संवाद दौऱ्याच्या माध्यमातून आपण कार्यकर्त्यांच्या भेटीला आलो असून, या माध्यमातून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करणार आहोत. या पक्षात कार्यकर्ता हा केंद्रबिंदू मानला जातो. म्हणून कार्यकर्त्यांनी पक्ष बळकटीसाठी कामाला लागावे व जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.
रिसामा येथील विजयालक्ष्मी सभागृह येथे रविवारी आयोजित कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकनकर, विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनील गहाणे, रविकांत बर्वे, प्रवीण कुंटे पाटील, आ. मनोहर चंद्रिकापुरे, माजी आ. राजेंद जैन, प्रदेश महासचिव विजय शिवणकर, विधानसभा अध्यक्ष रमेश ताराम, जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन, प्रभाकर दोनोडे, केतन तुरकर, तालुकाध्यक्ष कमलबापू बहेकार, सी. के. बिसेन, तुकाराम बोहरे, अंजली बिसेन, रेखा ओकटे, माजी जि. प. सदस्य सुकराम फुंडे, सुरेश हर्षे, राजेश भक्तवर्ती, जियालाल पंधरे, दुर्गा तिराले, जयश्री पुंडकर, कविता रहांगडाले, प्रमोद शिवणकर, तुकडू रहांगडाले, टिकाराम मेंढे, रविंदम मेश्राम, तिरथ येटरे, भारत पागोटे, आनंद शर्मा, सुमित कन्नमवार, संजय रावत, संगीता दोनोडे, उषा हर्षे, संतोष श्रीखंडे, तुंडीलाल कटरे, रवी क्षीरसागर, विनोद कन्नमवार, राजकुमार प्रतापगडे, रवींद्र कटरे, गगन छाबडा उपस्थित होते.