डीएचसीमध्ये सेवा न देणाऱ्या डॉक्टरांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 05:00 IST2020-10-11T05:00:00+5:302020-10-11T05:00:34+5:30

डीसीएचमध्ये जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांची ७ दिवसाच्या पाळीने ड्यूटी लावण्यात आली. मात्र पहिल्या पाळीच्या ७ डॉक्टरांनी जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या आदेशाला ठेंगा दाखवीत कर्तव्याला बुट्टी मारली. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांकडून सातही डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले. त्यातही ७ पैकी ५ डॉक्टरांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या आदेशानुरूप कसलेही लेखी उत्तर सादर केले नाही.

Action will be taken against doctors who do not provide services in DHC | डीएचसीमध्ये सेवा न देणाऱ्या डॉक्टरांवर होणार कारवाई

डीएचसीमध्ये सेवा न देणाऱ्या डॉक्टरांवर होणार कारवाई

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी बजाविले कारणे दाखवा । दोन डॉक्टर गैरहजर

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अतिरिक्त उभारण्यात आलेल्या डीएचसीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाºयांनी आळीपाळीने ड्यूटी लावण्यात आली होती. पहिल्या पाळीतील ७ डॉक्टरांनी जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकाºयांच्या आदेशाला धुडकावून डीएचसीमध्ये रूजू होणे टाळले. यावरून बुधवारी त्या सातही डॉक्टरांना जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात बोलाविण्यात आले होते. मात्र, या आदेशालाही दोन डॉक्टरांनी ठेंगा दाखिवला.यामुळे त्या दोन्ही डॉक्टरांवर कारवाई होणार असल्याची माहिती आहे.
वाढत्या कोरोना संसर्गाला लक्षात घेऊन जिल्हा आरोग्य प्रशासनाने राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे मागील महिन्यात अतिरिक्त १५० बेडचे डीसीएच तयार केले.
दरम्यान डीसीएचमध्ये जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांची ७ दिवसाच्या पाळीने ड्यूटी लावण्यात आली. मात्र पहिल्या पाळीच्या ७ डॉक्टरांनी जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या आदेशाला ठेंगा दाखवीत कर्तव्याला बुट्टी मारली. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांकडून सातही डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले. त्यातही ७ पैकी ५ डॉक्टरांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या आदेशानुरूप कसलेही लेखी उत्तर सादर केले नाही. त्यामुळे (दि.७) मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात सातही डॉक्टरांना बोलविण्यात आले. मात्र, ५ डॉक्टरांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांपुढे हजेरी लावली. तर दोन डॉक्टरांनी पुन्हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाला ठेंगा दाखिवला.

Web Title: Action will be taken against doctors who do not provide services in DHC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.