विनयभंगाच्या आरोपीला पाच वर्षांचा सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:47 IST2021-02-05T07:47:30+5:302021-02-05T07:47:30+5:30
गोंदिया : अल्पवयीन बालिकांच्या विनयभंगप्रकरणी विशेष पोक्सो जलदगती न्यायालयाने आरोपीला अभियोजन पक्षाचा पुरावा ग्राह्य धरून २ फेब्रुवारी २०२१ रोजी ...

विनयभंगाच्या आरोपीला पाच वर्षांचा सश्रम कारावास
गोंदिया : अल्पवयीन बालिकांच्या विनयभंगप्रकरणी विशेष पोक्सो जलदगती न्यायालयाने आरोपीला अभियोजन पक्षाचा पुरावा ग्राह्य धरून २ फेब्रुवारी २०२१ रोजी आरोपीला कलम ८, १०, १२ बाल लैंगिक अत्याचार कायदा २०१२ व कलम ३५४ ब अन्वये अनुक्रमे ३ वर्षे, ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
गोरेगाव तालुक्यातील चोपा येथील आरोपी बुधराम किसन चाचेरे (२०) याने २ वर्षांच्या अल्पवयीन बालिकांना फुगे घेण्याचे आमिष दाखवून गावाबाहेरील झुडपी जंगलात नेले. तेथे तिचा विनयभंग केला होता. या प्रकरणात पीडित मुलीच्या आई-वडिलांनी आरोपीविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत तक्रार दाखल केली होती. आरोपीविरुद्ध कलम ८, १०, १२ बाल लैंगिक अत्याचार कायदा २०१२ व कलम ३५४ ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक भरत कऱ्हाडे यांनी करून पुरावे न्यायालयात सादर केले. यात विशेष पोक्सो जलदगती न्यायालयाने आरोपीला अभियोजन पक्षाचा पुरावा ग्राह्य धरून २ फेब्रुवारी २०२१ रोजी आरोपीला कलम ८, १०, १२ बाल लैंगिक अत्याचार कायदा २०१२ व कलम ३५४ ब अन्वये अनुक्रमे ३ वर्षे, ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे, तसेच ६ हजार ५०० रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षा भोगण्याचे आदेश करण्यात आले. जिल्हा सरकारी वकील महेश चांदवानी यांनी आरोपीविरुद्ध दोष सिद्ध करण्यासाठी १२ साक्षीदार तपासले. या प्रकरणात पीडितेची बाजू न्यायालयात विशेष सरकारी वकील कृष्णा डी. पारधी यांनी मांडली.