गोंदिया जिल्ह्यात अपघात; पत्नी व मुलगा गंभीर, पतीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 10:43 AM2018-09-18T10:43:11+5:302018-09-18T10:44:00+5:30

तुमसर-गोंदिया मार्गावर मंगळवारी सकाळी ८.३० च्या सुमारास एका भरधाव ट्रकने चारचाकी वाहनाला दिलेल्या धडकेत वाहनचालक जागीच ठार झाला तर त्याची पत्नी व मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.

Accidents in Gondia district; Wife and son serious, husband died | गोंदिया जिल्ह्यात अपघात; पत्नी व मुलगा गंभीर, पतीचा मृत्यू

गोंदिया जिल्ह्यात अपघात; पत्नी व मुलगा गंभीर, पतीचा मृत्यू

Next
ठळक मुद्देट्रकने दिली धडक

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तुमसर-गोंदिया मार्गावर मंगळवारी सकाळी ८.३० च्या सुमारास एका भरधाव ट्रकने चारचाकी वाहनाला दिलेल्या धडकेत वाहनचालक जागीच ठार झाला तर त्याची पत्नी व मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.
रामटेक येथील अंबाला येथील रहिवासी असलेले संजय गौतम हे आपल्या कुटुंबासह जात असताना हा अपघात झाला. यात संजय गौतम हे ठार झाले तर त्यांची पत्नी रंजना व मुलगा पिंटू हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तुमसर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात कारचा चेंदामेंदा झाला आहे.

Web Title: Accidents in Gondia district; Wife and son serious, husband died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात