गोंदियाजवळ भीषण अपघात; सासू व सून जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 16:17 IST2020-01-07T16:16:45+5:302020-01-07T16:17:11+5:30
राजनंदगावकडून नागपूरकडे येत असलेल्या चारचाकी वाहनाला गोंदिया जिल्ह्यातील देवरीजवळ भीषण अपघात होऊन त्यात सासू व सून जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी १ च्या सुमारास घडली.

गोंदियाजवळ भीषण अपघात; सासू व सून जागीच ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया- राजनंदगावकडून नागपूरकडे येत असलेल्या चारचाकी वाहनाला गोंदिया जिल्ह्यातील देवरीजवळ भीषण अपघात होऊन त्यात सासू व सून जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी १ च्या सुमारास घडली.
यवतमाळ येथे एमएसईबी येथे डेप्युटी इंजिनियर म्हणून काम करत असलेले महेश चतुर्वेदी हे आपल्या कुटुंबियांसह राजनंदगाव येथे गेले होते. तेथून परत येत असताना गोंदिया जिल्ह्यातील देवरीजवळच्या पुलावर त्यांची चार चाकी अनियंत्रित होऊन पुलाखाली कोसळली. या अपघातात गाडीचा चुराडा झाला. यात त्यांची आई भारती चतुर्वेदी (६५ ) व पत्नी नीता या जागीच ठार झाल्या. त्यांची मुलगी पलक (१३) व स्वत: महेश हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.