अपघात विम्याचा दोन कुटुंबांना लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:00 IST2019-12-23T05:00:00+5:302019-12-23T05:00:10+5:30
कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहिंना अपंगत्व येते. अशा अपघातग्रस्त किंवा त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यास किंवा त्यांच्या वारसादारास दोन लाख रुपयांचे संरक्षण दिले जात असून तालुक्यातील दोन शेतकरी कुटुंबांना याचा लाभ मिळाला आहे.

अपघात विम्याचा दोन कुटुंबांना लाभ
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : शेती करताना होणारे अपघात जसे वीज पडणे, पुर येणे, सर्पदंश, विंचूदंश, करंट लागणे इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहिंना अपंगत्व येते. अशा अपघातग्रस्त किंवा त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यास किंवा त्यांच्या वारसादारास दोन लाख रुपयांचे संरक्षण दिले जात असून तालुक्यातील दोन शेतकरी कुटुंबांना याचा लाभ मिळाला आहे.
तिरोडा तालुक्यात सन २०१८-१९ मध्ये १० ते ७५ वयोगटातील ४४ हजार २१६ शेतकऱ्यांनी संपूर्ण विमा हप्ता राज्य शासनामार्फत विमा कंपनीला प्रदान केला आहे.
१३ शेतकरी व वारसांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर केले. त्यात दोघांना प्रत्येकी दोन लाख असे चार लाख वारसदारांच्या बँक खात्यावर विमा कंपनीने जमा केले असून उर्वरीत प्रोसेसमध्ये असल्याचे सांगितले.
अपघाती मृत्यू झालस दोन लाख, अपघातात दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख, अपघातात एक डोळा-एक अवयव निकामी झाल्यास दोन लाख रूपये देण्यात येते. कुटुंबातील १० ते ७५ वयोगटातील एकूण दोन जनांकरिता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा राबविण्यात येत आहे.
या योजनेचा मध्यस्तांना फायदा होवू नये, प्रत्यक्ष शेतकरी कुटुंबालाच फायदा मिळावा या हेतूने तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने यांनी आपल्या अधिनस्थ सर्व क्षेत्रीय अधिकारी-कर्मचाºयांना अपघातग्रस्त कुटुंबांचा शोध घेवून त्यांना सर्वतोपरी मदत करुन प्रस्ताव ३ महिन्यांच्या आत तालुका कार्यालयास सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत.