प्रतिकूल परिस्थितीत निर्णय घेण्याची क्षमता असावी
By Admin | Updated: March 8, 2015 01:16 IST2015-03-08T01:16:49+5:302015-03-08T01:16:49+5:30
स्वप्न बघावे तर ते साकारही करावे, कारण स्वप्नपूर्तीसाठी अनेक प्रतिस्पर्धी सज्ज आहेत. त्यात आपला घात होण्याची शक्यता असते.

प्रतिकूल परिस्थितीत निर्णय घेण्याची क्षमता असावी
कालीमाटी : स्वप्न बघावे तर ते साकारही करावे, कारण स्वप्नपूर्तीसाठी अनेक प्रतिस्पर्धी सज्ज आहेत. त्यात आपला घात होण्याची शक्यता असते. म्हणून प्रतिकूल परस्थितीत उत्तम निर्णय घेण्याची क्षमता असावी असे प्रतिपादन देवरीच उपविभागीय अधिकारी दुर्वेश सोनवाने यांनी केले. येथील केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळेत लोकमत लघु जाहिरात विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या स्वच्छ गाव, स्वच्छ शाळा या विषयावरील चित्रकला स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ््यात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार ए.के.कदम होते. प्रमुख पाहुणे म्हणून लघु जाहिरात विभागाचे जिल्हा प्रतिनिधी राजीव फुंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश गेलानी, मुख्याध्यापक डी.टी.लाडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष टेकचंद बोपचे, मंडळ अधिकारी डी.एम.मेश्राम, तलाठी आर.एच.मेश्राम, सेवानिवृत्त वनपरिक्षेत्राधिकारी दहिवले, युवराज पटले, पुरूषोत्तम टेंभरे, दैवल मेंढे, पुष्पा खोब्रागडे, पुष्पा बहेकार, शामकला शेंडे, सुनिता पारधी उपस्थित होते.
पुढे बोलताना त्यांनी, मेहनत, जिद्द, दिशा, पूर्ण नियोजन व व्यापक दृष्टीकोन या गुणांचा अंगीकार करून यशाचे शिखर गाठणे सोयीस्कर होते. तसेच आई-वडील आपल्या गरजा दूर सारून आपल्या पाल्यांच्या गरजा पूर्ण करतात. म्हणून त्यांनी पाहिलेले चांगल्या भविष्याचे स्वप्न पूर्ण करताना आपण बेईमानी करू नये असे मत मांडले.
कदम यांनी, विद्यार्थ्याला संस्काराच्या चौकटीत राहून बिनधास्त जीवन जगण्याचा सल्ला दिला. तर स्वच:ला कधीही कमी लेखू नये, कारण प्रत्येकात आगळावेगळा गुण लपून असते. त्यावर प्रकाश टाकण्यासाठी शाळेपलीकडील ज्ञान आवश्यक असते असे सांगीतले.
दरम्यान, चित्रकला स्पर्धेत माध्यमिक गटात प्रथम पवन जैपाल गिऱ्हेपुंजे, द्वितीय तृप्ती भिकराज चव्हाण, तृतीय सोहम झिंकटराव रहांगडाले तर प्राथमिक गटात प्रथम दामिनी भोजराज गिऱ्हेपुंजे, द्वितीय कोमल राजेश उके तर तृतीय क्रमांक सुनंगा गोपाल उके यांनी पटकाविला. तसेच प्रोत्साहन पुरस्कार दिक्षा फुंडे, योगेश्वरी कुकडीबुरे, प्राची फुंडे, मोहिनी कापसे, स्नेहा शेंडे, सागर बिसेन, प्राण वासनीक, जितेंद्र साठवणे, आचल भांडारकर, संगीता फुंडे, धारा रहांगडाले, साक्षी अशोक खोब्रागडे, रोहीत गिऱ्हेपुंजे, भागवत चौधरी यांनी पटकाविला असून त्यांना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले. प्रास्तावीक येळे मांडले. संचालन बी.पी. चव्हाण यांनी केले. आभार वाय.आर. पटले यांनी मानले. कार्यक्रमासाठी एस.आर.चौधरी, बी.के. मेंढे, जे.व्ही.बुद्धेवार, एम.जी. कांबळे, जी.डी. भाकरे, सी.डी. तुरकर, एस.यु. पोचलवार, छाया तरोणे, ग्राम सचिव ओ.जी. बिसेन, रोशन बोहरे, संजय दोनेडे व आकृती बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)