आमगाव शहर सुरक्षित, ठाणे असुरक्षित
By Admin | Updated: October 21, 2015 01:52 IST2015-10-21T01:52:52+5:302015-10-21T01:52:52+5:30
चोरी, दरोडा व असामाजिक तत्त्वांचा शिरकाव होऊ नये यासाठी आमगाव पोलिसांनी शहरातील नागरिकांकडून वर्गणी करून सुरक्षेच्या दृष्ट्रीने सीसीटीव्ही कॅमेरे आठ महिन्यापूर्वीच बसविले.

आमगाव शहर सुरक्षित, ठाणे असुरक्षित
अजब कारभार : ३० हजार वेतनाच्या शिपायाला फक्त नाव लिहिण्याचे काम
ओ.बी.डोंगरवार आमगाव
चोरी, दरोडा व असामाजिक तत्त्वांचा शिरकाव होऊ नये यासाठी आमगाव पोलिसांनी शहरातील नागरिकांकडून वर्गणी करून सुरक्षेच्या दृष्ट्रीने सीसीटीव्ही कॅमेरे आठ महिन्यापूर्वीच बसविले. यामुळे आमगाव शहर सुरक्षित झाले आहे. परंतु येथील उपविभागीय पोलिस अधिकारी यांना आमगाव पोलीस ठाणेच असुरक्ष्ीित वाटत असल्यामुळे त्यांनी आमगाव पोलिस ठाण्याचे चक्क गेटच बंद केले. तक्रार करण्यास येणाऱ्या नागरिकांचीच चौकशी करण्यासाठी गेटवर ३० हजार रूपये वेतनाचा कर्मचारी बसवून ठेवला आहे.
आमगाव पोलीस ठाणे नक्षलग्रस्त भागात नाही. अत्यंत शांतता प्रिय असलेले हे गाव आता येथील उपविभागीय अधिकारी दीपाली खन्ना यांना असुरक्षीत वाटू लागल्याने त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यास येणाऱ्या नागरिकांची आता विचारपूस करण्यासाठी एक पोलीस कर्मचारी गेटवर बसवून ठेवला आहे. या ठाण्याचे गेट बंद करून फक्त रजीस्टर घेऊन एका महिला कर्मचारीला दिवसभर उन्हात बसवून ठेवले जाते. पोलीसांची भिती आधीच मनात असल्याने अनेक लोक अन्याय सहन करून पोलिस ठाण्यात जात नाही. एखाद्याने पोलीस ठाण्यापर्यंत जाण्याचा माणस बांधला तरी त्याला गेट बंद असल्याचे पाहून जाऊ की याची असे वाटते. हिंमत करून एखादा तक्रार करायला जातो म्हणून गेटमधून आत जाण्याचा प्रयत्न केला तर तेथे ड्युटीवर असलेल्या व्यक्कीकडून नाव व मोबाईल नंबर मागितला जातो. नंतर त्याला आत जाण्याची परवनागी दिली जाते. आमगाव शहरातील गुन्हेगारीवरू आळा घालण्यासाठी पोलिसांनी लोकवर्गणीतून सीसीटीव्ही कॅमेरे शहराच्या अनेक भागात लावले. त्यामुळे येथील चोऱ्यांवर आळा बसला. शहर सुरक्षित झाले. मात्र आता सद्या नियुक्त झालेल्या उपविभागीय अधिकारी दीपाली खन्ना यांनी आल्या आल्या पोलीस ठाण्याचेच दार बंद केले. पोलीस ठाण्यात येणाऱ्यांना फक्त नाव व मोबाईल क्रमांक मागून त्यांना स्वाक्षरी करायला लावली जाते. जे शहर शांततेचे प्रतीक आहे. त्या शहरातील पोलिस ठाणे अचानक असुरक्षित का वाटू लागले अशी शंका अनेकांच्या मनात आली. परंतु याचे उत्तर पोलीस प्रशासनाकडे नाही.
मनुष्यबळ नाही; मग व्यर्थ का घालवता?
पोलीस विभागात मनुष्यबळ अपुरा आहे अश्या बोंबा ठोकल्या जातात. दुर्गा उत्सव सद्या जोमात सुरू आहे. मनुष्यबळ नसल्यामुळे गृहरक्षक दलाच्या महिला व पुरूषांना बोलविले जाते. बंदोबस्तासाठी त्यांची मदत घेतली जाते. परंतु या उत्सवाच्या दरम्यान ३० हजार रूपये वेतनाचा एक पोलिस शिपाई गेटवर बसून येणाऱ्या-जाणाऱ्यांचे फक्त नाव लिहून स्वाक्षरी मागतात. या गटेवर मनुष्यबळ घालवून काहीही अर्थ निघत नाही. येणाऱ्या जाणाऱ्यांना ओळखपत्रही मागतिले जात नसल्याने येणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर नाव लिहीले राहात नाही ते चुकीचे नाव व चुकीचा मोबाईल क्रमांक सांगू शकतात. कसलाही पुरावा न मागता फक्त नाव विचारण्यासाठी ३० हजार रूपयाचा कर्मचारी बसवून ठेवणे गरजेचे नाही.
दारावर सीसीटीव्ही बसवा
आमगाव पोलीस ठाण्यांत येणाऱ्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी ३० हजार वेतनाचा कर्मचारी ठेवण्यापेक्षा ३ हजार रूपयाचा एक सीसीटीव्ही कॅमेरा ठेवल्यास प्रत्य हालचालींवर नजतही टाकली जाईल व मनुष्य बळ वाया जाणार नाही. बड्या अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे शक्कल लढविण्याची गरज आहे.