डोळ्यात मिरची पावडर टाकून युवकाचा केला खून
By अंकुश गुंडावार | Updated: May 19, 2023 18:31 IST2023-05-19T18:30:44+5:302023-05-19T18:31:08+5:30
Gondia News गोंदिया शहरातील भीमनगर येथे डोळ्यात मिरची पावडर टाकत मारेकऱ्यांनी एका युवकाचा धारदार शस्त्राने भोसकून खून केला.

डोळ्यात मिरची पावडर टाकून युवकाचा केला खून
अंकुश गुंडावार
गोंदिया : शहरातील भीमनगर येथे डोळ्यात मिरची पावडर टाकत मारेकऱ्यांनी एका युवकाचा धारदार शस्त्राने भोसकून खून केला. ही घटना शुक्रवारी (दि.१९) सकाळी सहाच्या सुमारास घडली. पंकज मेश्राम (३२) रा. भीमनगर असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
भीमनगर येथील पंकज मेश्राम (३२) याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकत मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने भोसकून त्याचा खून केला. ही घटना शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास येथील भीमनगरात घडली. पंकज मेश्राम हा घरी झोपेत असताना मारेकऱ्यांनी त्याच्या घरात प्रवेश केला व त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. त्यानंतर धारदार शस्त्राने भोसकून त्याचा खून केला. दरम्यान पंकजवर आरोपी हल्ला करीत असल्याची बाब या परिसरातील युवकाच्या लक्षात येताच त्यांनी आराेपींच्या तावडीतून पंकजला सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी त्यांच्यावर सुद्धा चाकूने वार करून जखमी केले.
या युवकाला केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती सुद्धा गंभीर असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर मारेकरी फरार झाले आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपीच्या शोधात पथके रवाना केली आहे.