गोंदियात धावत्या ट्रकला आग; जीवित हानी टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2022 20:31 IST2022-03-29T20:30:33+5:302022-03-29T20:31:23+5:30
Gondia News गोंदिया शहराच्या जयस्तंभ चौकातील प्रशासकीय इमारतीसमोरून धावणाऱ्या एका ट्रकला अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी (२९ मार्च) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

गोंदियात धावत्या ट्रकला आग; जीवित हानी टळली
गोंदिया : शहराच्या जयस्तंभ चौकातील प्रशासकीय इमारतीसमोरून धावणाऱ्या एका ट्रकला अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी (२९ मार्च) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.
गोंदियाच्या शक्ती चौकातून जयस्तंभ चौकाकडे धावणाऱ्या ट्रकला (क्रमांक एमएच २७ - एक्स ८७४८) अचानक आग लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ट्रकला आग लागल्याने या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांनी गोंदिया नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले. अग्निशमन दलाची दोन वाहने दाखल झाली आणि जवानांनी अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, अनुचित प्रकार घडू नये म्हणून गोंदिया शहर पोलीस व जिल्हा वाहतूक पोलीसही घटनास्थळावर लक्ष ठेवून होते.