जिल्ह्यातील ९१ हजार ८११ विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश

By Admin | Updated: May 12, 2014 23:50 IST2014-05-12T23:50:40+5:302014-05-12T23:50:40+5:30

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना राज्यशासनातर्फे गणवेश पुरविले जाते.

9,1,811 students of the district will get uniforms | जिल्ह्यातील ९१ हजार ८११ विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश

जिल्ह्यातील ९१ हजार ८११ विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश

गोंदिया : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना राज्यशासनातर्फे गणवेश पुरविले जाते. सन सत्र २0१४-१५ मध्ये जिल्ह्यातील ९१ हजार ८११ विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार आहे.

गोंदिया जिल्हा परिषदेच्या हजारो शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत ९१ हजार ८११ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजे २६ जून रोजी प्रत्येक विद्यार्थ्याला गणवेश दिला जाणार आहे. वर्षाकाठी दोन गणवेश देण्याची योजना आहे. पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थी गणवेषात यावे यासाठी शासन गणवेश देण्याची योजना राबवित आहे. राज्यशासन १0३ विकास गटातून काही विद्यार्थ्यांना एक गणवेश देतो.

शाळेची पहिली घंटा वाजताच त्यांना गणवेश दिला जातो. अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील ९ हजार ८७४, आमगाव तालुक्यातील ९ हजार २२३, देवरी ८ हजार ३८0, गोंदिया २४ हजार ४९0, गोरेगाव ९ हजार ५0७, सडक/अर्जुनी ८ हजार १00, सालेकसा ८ हजार १९७ तर तिरोडा तालुक्यातील १४ हजार ४0 विद्यार्थ्यांंना गणवेश वाटप केला जाणार आहे.

यासाठी जिल्हा परिषदेच्या सार्वशिक्षा अभियानाचे दिलीप बघेले यांनी गणवेशासाठी शासनाला पैश्याची मागणी केली आहे.या गणवेशासाठी तीन कोटी २६ लाख २५ हजार ६00 रूपयाची मागणी केली आहे.

शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश द्यायचे असेल तर सदर निधी १५ दिवसापुर्वी शासनाने देणे गरजेचे आहे. मागच्या वर्षी शासनाने गणवेशाचे पैसे उशिरा दिल्यामुळे विद्यार्थ्याना गणवेश देण्यासाठी मुख्याध्यापकांची तारांबळ उडाली होती. काही मुख्याध्यापकांनी आपल्या खिशातील पैसे खचर करून गणवेश खरेदी केले होते. तर काहींनी पैसे खर्च केले नव्हते. त्यामुळे अर्धसत्र लोटत पर्यंत अनेक विद्यार्थ्याना गणवेश मिळाला नव्हता.

यावर्षी असे होऊ नये म्हणून गणवेशाचा निधी पंधरा दिवसापुर्वी द्या अशी मागणी करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 9,1,811 students of the district will get uniforms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.