गोंदिया-बालाघाट जिल्ह्यात आढळले ८६ सारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 08:50 PM2018-06-17T20:50:37+5:302018-06-17T20:50:37+5:30

गोंदिया जिल्ह्याचे वैभव असलेल्या सारस पक्ष्यावर अनेक संकट असल्यामुळे त्यांची संख्या झपाट्याने वाढण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहेत. तरी देखील त्यांच्या संर्वधनासाठी सेवा संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.

86 stork found in Gondia-Balaghat district | गोंदिया-बालाघाट जिल्ह्यात आढळले ८६ सारस

गोंदिया-बालाघाट जिल्ह्यात आढळले ८६ सारस

googlenewsNext
ठळक मुद्दे६० ठिकाणी गणना : सेवासंस्थेसह २२ पथकांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया जिल्ह्याचे वैभव असलेल्या सारस पक्ष्यावर अनेक संकट असल्यामुळे त्यांची संख्या झपाट्याने वाढण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहेत. तरी देखील त्यांच्या संर्वधनासाठी सेवा संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. १० जून रोजी २२ पथकांनी केलेल्या सारस गणनेत गोंदिया जिल्ह्यात ३४ ते ३८ व बालाघाट जिल्ह्यात ४४ ते ४८ सारसांची संख्या आढळल्याची माहिती सेवा संस्थेने दिली आहे. गोंदिया व बालाघाट या सारस स्केपमध्ये सारसांची संख्या ८६ झाली आहे.
पर्यावरण व वन्यजीव संरक्षणासाठी प्रयत्नरत असलेल्या सेवा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार, संरक्षण प्रकल्प प्रभारी आय.आर. गौतम यांच्या मार्गदर्शनात पारंपारीक पद्धतीने सारस गणना करण्यात आली. १० ते १६ जून या दरम्यान सारस गणना करण्यात आली. जिल्ह्यातील शेत, तलाव व नदीकाठी ही गणना करण्यात आली. यांतर्गत, सतत सहा दिवस ५० ते ६० ठिकाणी २२ पथकांच्या माध्यमातून सारस गणना करण्यात आली. सारसांच्या विश्रांतीच्या ठिकाणी सकाळी ५ वाजता पासून सकाळी ११ वाजता पर्यंत वन्यप्रेमी सारसांची गणना करण्यासाठी थांबायचे. एका पथकात २ ते ३ सदस्यांचा समावेश होता.
संस्थेच्या सदस्यांच्या माध्यमातून सारसांचा अधिवास, प्रजनन अधिवास व भोजनाच्या ठिकाणी भ्रमनपथाचा अभ्यास केला गेला. सारसाचा ज्या ठिकाणी अधिवास आहे त्या ठिकाणच्या लोकांना सारसाचे महत्व सांगितले गेले. मागील ४-५ वर्षापासून सेवा संस्थेद्वारे बालाघाट जिल्ह्यातही सारस संरक्षण व संवर्धनाचे काम स्थानिक स्वयंसेवी संस्थेकडून शेतकऱ्यांच्या मदतीने करण्यात येत आहे. १२ जून रोजी अभय कोचर व अभिजीत परिहार यांच्या मार्गदर्शनात सारस गणना करण्यात आली.
सारस गणनेसाठी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, बालाघाटचे जिल्हाधिकारी डी.व्ही. सिंग यांचे मार्गदर्शन लाभले. गोंदियाचे उपवनसंरक्षक एस. युवराज, बालाघाटचे वन मंडळ अधिकारी देवप्रसाद यांनी सहकार्य केले. सारस गणनेला जिल्हा प्रशासन, गोंदिया निसर्ग मंडळ, वन विभाग गोंदिया, वनविभाग बालाघाट व चंद्रपूरच्या इको प्रो संस्थेने सहकार्य केले.
महाराष्ट्रात केवळ ४२ सारस
सारस गोंदिया, भंडारा व चंद्रपूर येथे आढळले. संपूर्ण महाराष्ट्राच्या सिमेअंतर्गत भागात सारस आढळत आहे. सन २०१७ च्या गणनेनुसार महाराष्ट्रात ३८ ते ४२ सारस आहेत. सन २०१८ च्या गणनेत सारसांच्या संख्येत वाढ झाली आहे. तर काही सारसांचा मृत्यू देखील झाल्याचे नमूद करण्यात आले. विषबाधा व करंट लागून सारसांचा मृत्यू झाला आहे. भंडारा जिल्ह्यात ३ सारस तर चंद्रपूर येथे एक सारस आढळला आहे.
सारस गणनेत यांचा समावेश
सारस गणना करणाऱ्यांमध्ये मुनेश गौतम, सावन बहेकार, अभिजीत परिहार, अभय कोचर, दुष्यंत रेंभे, अंकीत ठाकूर, शशांक लाडेकर, चेतन जसानी, मुकुंद धुर्वे, संजय आकरे, बबलू चुटे, दुष्यंत आकरे, अशोक पडोळे, प्रविण मेंढे, जलाराम बुधेवार, विशाल कटरे, कन्हैया उदापुरे, मोहन राणा, सलीम शेख, राकेश चुटे, रतीराम क्षीरसागर, पिंटू वंजारी, रूचीर देशमुख, अश्वीनी पटेल, सिकंदर मिश्रा, कमलेश कामडे, निशांत देशमुख, हरगोविंद टेंभरे, राहूल भावे, विकास महारवाडे, महेंद्र फरकुनडे, जयपाल ठाकूर, विकास फरकुंडे, विक्रांत साखरे, विजय विदानी, मधुसूदन डोये, शेरबहादूर कटरे, निखील बिसेन, रमेश नागरिकर, चंदनलाल रहांगडाले, बंटी शर्मा, डिलेश कुसराम व प्रशांत मेंढे यांचा समावेश होता.

Web Title: 86 stork found in Gondia-Balaghat district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :forestजंगल