८२ हजार क्विंटलने वाढ : पणन व टीडीसीची खरीप हंगाम खरेदी

By Admin | Updated: February 17, 2015 01:53 IST2015-02-17T01:53:58+5:302015-02-17T01:53:58+5:30

गोंदिया : दरवर्षी शेतकऱ्यांच्या धानपिकांना विविध शासकीय धान खरेदी केंद्रांमार्फत महाराष्ट्र

82 thousand quintal increase: buy marketing and TDC kharif season | ८२ हजार क्विंटलने वाढ : पणन व टीडीसीची खरीप हंगाम खरेदी

८२ हजार क्विंटलने वाढ : पणन व टीडीसीची खरीप हंगाम खरेदी

गतवर्षीपेक्षा धानाचे उत्पन्न वाढले
गोंदिया :
दरवर्षी शेतकऱ्यांच्या धानपिकांना विविध शासकीय धान खरेदी केंद्रांमार्फत महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाकडून खरेदी करण्यात येते. यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे मानले जात होते. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा खरीप हंगामात तब्बल ८२ हजार ८२ क्विंटल जास्त धान खरेदी करण्यात आली.
गेल्यावर्षी म्हणजे सन २०१३-१४ च्या खरीप हंगामात जिल्ह्याला अतिवृष्टीने ग्रासले होते. अशा परिस्थितीत मार्केटिंग फेडरेशनमार्फत जिल्ह्यातील ५४ धान खरेदी केंद्रांवर एकूण तीन लाख ४३ हजार ९७५ क्विंटल धानपिकाची खरेदी झाली होती. तसेच आदिवासी विकास महामंडळामार्फत एकूण ४० धान खरेदी केंद्रांद्वारे तीन लाख २३ हजार १४ क्विंटल धान खरेदी करण्यात आली होती. या दोन्ही एजन्सीकडून जिल्ह्यातील एकूण ९४ धान खरेदी केंद्रांद्वारे सहा लाख ६६ हजार ९८९ क्विंटल धान खरेदी झाली होती.
यावर्षी कमी पावसामुळे धानपिकाला फटका बसला. मात्र तरीही गेल्यावर्षीच्या तुलनेत परिस्थिती चांगली असल्याचे धान खरेदीवरून दिसून येते. सन २०१४-१५ मध्ये मार्केटिंग फेडरेशनने ४६ धान खरेदी केंद्रांमार्फत खरिप हंगामात तीन लाख ७२ हजार ८१८.४७ धानाची खरेदी केली आहे. तर आदिवासी विकास महामंडळाने ४० धान खरेदी केंद्रांद्वारे १३ फेब्रुवारी २०१५ पर्यंत एकूण तीन लाख ७६ हजार २१६ क्विंटल धानाची खरेदी केली आहे.
यंदा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाने जिल्ह्यातील एकूण ८६ धान खरेदी केंद्रांद्वारे सात लाख ४९ हजार ०३४ क्विंटल धान खरेदी केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही धान खरेदी ८२ हजार ०४५ क्विंटल जास्त झाली आहे.
सन २०१३-१४ च्या खरीप हंगामात तीन महिन्यापर्यंत अनेक तालुक्यांना अतिवृष्टीने ग्रासले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकटही कोसळले होते.
शेतकऱ्यांची पिके पाण्यात बुडून खराब झाली होती. त्यामुळे धानाच्या उत्पादनात घट झाल्याचे व धान खराब झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत होते. त्यामुळेच धानाचे कमी उत्पादन होवून सन २०१३-१४ मध्ये शेतकऱ्यांकडून कमी प्रमाणात धान विक्री करण्यात आली होती.
त्या तुलनेत यंदा सन २०१४-१५ मध्ये कमी प्रमाणात मात्र आवश्यक त्या वेळी पाऊस पडल्याने धान उत्पादनात भर झाली. त्यामुळेच शेतकरी अधिक प्रमाणात धान विक्री करू शकल्याने शासनाच्या धान खरेदीत वाढ झाली. (प्रतिनिधी)
आदिवासी विकास महामंडळाची खरेदी
सन खरेदी (क्विंटल)
२००८-०९ ४,१५,५२०
२००९-१० ५,५५,९७०
२०१०-११ ४,२५,२७६
२०११-१२ ४,५५,१०३
२०१२-१३ ४,२७,२६३
२०१३-१४ ३,२३,०१४
२०१४-१५ ३,७६,२१६
मार्केटिंग फेडरेशनची धान खरेदी
सन खरेदी केंद्र खरेदी (क्विंंटल
२००८-०९ ३८ २,१२,९५१
२००९-१० ४० ३,१३,६८७
२०१०-११ ४१ २,३०,७३८
२०११-१२ ४२ ४,०१,६२७
२०१२-१३ ६९ ४,८८,४१०
२०१३-१४ ५४ ३,४३,९७५
२०१४-१५ ४६ ३,७२,८१८

Web Title: 82 thousand quintal increase: buy marketing and TDC kharif season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.