गोंदिया जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयाचे ८० विद्यार्थी देणार कोविड काळात सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 12:54 IST2021-04-24T12:53:16+5:302021-04-24T12:54:29+5:30
Gondia News शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या एमबीबीएसच्या पहिल्या बॅचचे ८९ विद्यार्थी कोविड रुग्णांना सेवा देणार आहेत.

गोंदिया जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयाचे ८० विद्यार्थी देणार कोविड काळात सेवा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सध्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून, शासकीय आणि खासगी रुग्णालयातील बेडसुध्दा अपुरे पडत आहेत. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांवर वेळीच उपचार करण्यास अडचण निर्माण होत आहे. अशात आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या एमबीबीएसच्या पहिल्या बॅचचे ८९ विद्यार्थी कोविड रुग्णांना सेवा देणार आहेत.
सन २०१६ मध्ये गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळाली. १०० विद्यार्थी क्षमतेचे एमबीबीएस या अभ्यासक्रमाला सुरुवात झाली. यातील ८९ विद्यार्थ्यांचा जवळपास अभ्यासक्रम पूर्ण होत आहे. या विद्यार्थ्यांना कोविड संसर्ग काळात सेवेसाठी स्वयंसेवक म्हणून कार्य करावे, अशी विनंती वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून करण्यात आली आहे. यापैकी १२ विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनाच्या विनंतीला होकार दिला आहे. जवळपास ४० ते ५० विद्यार्थी डॉक्टर या सेवेत सहभाग होणार, असा विश्वास अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे यांनी व्यक्त केला. येत्या काही दिवसात या महाविद्यालयातील पहिली बॅच वैद्यकीय सेवेसाठी निघणार आहे. सध्या कोरोना संसर्गाचा काळ आहे. अशा परिस्थितीत आरोग्य सेवेत मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण होत आहे. याकरिता एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षातील एकूण ८९ विद्यार्थ्यांना कोरोना काळात सेवा द्यावी, अशी विनंती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून करण्यात आली आहे. यापैकी १२ विद्यार्थ्यांनी सेवा पुरविण्याचा होकार दिला आहे. तसेच आणखी ४० ते ६० विद्यार्थी या सेवेसाठी पुढाकार घेतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.