शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय क्वारंटाईन कक्षात ६९ जण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 05:00 IST

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी दक्ष राहून उपाययोजना करण्यात येत आहे. त्यामुळेच जिल्ह्यात मागील २४ दिवसांत एक रूग्ण आढळून आला नाही. यामुळेच केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने गोंदिया जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोनमध्ये केला आहे.

ठळक मुद्दे२४ दिवसांत नवीन रूग्णाची नोंद नाही : २६ स्वॅब नमुन्यांची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील ७ क्वारंटाईन कक्षात सध्या ६९ जण उपचार घेत आहेत. यात जिल्हा क्र ीडा संकुल येथे २०, एमएस आयुर्वेदिक महाविद्यालयात १७, ग्राम चांदोरी येथे ११, तिरोडा येथील लिटल बर्ड कान्व्हेंट येथे पाच, ग्राम डव्वा येथील समाज कल्याण निवासी शाळेत सहा, ग्राम इळदा येथील शासकीय आश्रमशाळेत पाच तर ग्राम बिरसी उपकेंद्र येथे पाच अशा एकूण सात क्वारंटाईन कक्षात ६९ जणांचा समावेश आहे.जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी दक्ष राहून उपाययोजना करण्यात येत आहे. त्यामुळेच जिल्ह्यात मागील २४ दिवसांत एक रूग्ण आढळून आला नाही. यामुळेच केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने गोंदिया जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोनमध्ये केला आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण २५९ जणांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी २३३ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून हे सर्व नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे.तर २६ स्वॅब नमुन्याचा अहवाल प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे.जिल्ह्यात सध्या ‘जैसे थे’ आदेशगोंदिया जिल्ह्याचा ग्रीन झोनमध्ये समावेश असला तरी जिल्हा प्रशासनाने आठवडाभरापूर्वी आदेश काढून काही प्रमाणात शिथिलता दिली होती. तेच आदेश कायम आहेत. जीवनावश्यक वस्तूंसह, इलेक्ट्रीक, चष्मे, पंखे आदी दुकाने उघडण्यासाठी बुधवार, गुरूवार, शुक्र वारी या तीन दिवशी सकाळी ८ ते दुपारी २ वाजतापर्यत परवानगी आहे. जिल्ह्यातील बस सेवा सुरू करण्याबाबत सुद्धा अद्याप निर्णय झाला नाही. दारु दुकाने सुरू करण्याबाबत अद्याप आदेश काढण्यात आले नसून त्यासाठी स्वतंत्र आदेश काढण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करणे अनिवार्यजिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी सोमवारी काढलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील निमशासकीय व बँक कर्मचाऱ्यांना आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

टॅग्स :Socialसामाजिक