६६४ विद्यार्थ्यांनी घेतला आरटीईअंतर्गत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 10:43 IST2020-07-21T05:00:00+5:302020-07-24T10:43:28+5:30
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. सन २०२०-२१ चे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू झाले आहे. सद्यस्थितीत केंद्रावर पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रांची पडताळणी करणे अडचणीचे आहे.

६६४ विद्यार्थ्यांनी घेतला आरटीईअंतर्गत प्रवेश
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश देण्याची तरतूद आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शाळा उशीरा सुरू होत असल्याने आरटीईच्या प्रवेशाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.आतापर्यंत गोंदिया जिल्ह्यातील ९०३ जागांपैकी ६६४ जागांवर प्रवेश निश्चीत झाला आहे. उर्वरीत २३९ जागांवर प्रवेश झाला नाही.
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या वर्षासाठी आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशाबाबत ऑनलाईन अर्ज मागवून १७ मार्च २०२० रोजी लॉटरी काढण्यात आली होती. या लॉटरीद्वारे १ लाख ९२० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. ७५ हजार ४६५ विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी जाहीर केली. सर्व विद्यार्थ्यांना मेसेज पाठविण्यात आले आहेत. लॉकडाऊनमुळे पुढील प्रवेश प्रक्रियेचे काम काम झाले नाही.
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. सन २०२०-२१ चे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू झाले आहे. सद्यस्थितीत केंद्रावर पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रांची पडताळणी करणे अडचणीचे आहे. त्यामुळे केवळ या शैक्षणिक वर्षासाठी शाळास्तरावर कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी करून संकलन करून पडताळणी समितीच्या मान्यतेने प्रवेश देण्यात येत आहे. शाळेत आरटीई पोर्टलवर त्यांच्या लॉगिन विद्यार्थ्यांची नावे व मोबाईल क्रमांक दिले आहेत.या नावापुढे या दिनांकास विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी बोलवायचे आहे ती तारीख शाळा देत आहे. गर्दी होणार नाही अशा प्रकारे शाळेचे नियोजन करावे व कोणत्या तारखेला बोलावे हे शाळा ठरवित आहे. जिल्ह्यातील ९०३ जागांसाठी ३ हजार ६५८ अर्ज आले होते. प्रवेश घेण्यासाठी ८४७ बालकांच्या पालकांना तारीख देण्यात आली आहेत. तर ५६ बालकांच्या पालकांना तारीख देण्यात आली नाही.
२३९ विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया झाली नाही
अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या ९१ जागांसाठी ८६ बालकांच्या पालकांना तारीख देण्यात आली. ५ जणांना तारीख दिली नाही तर ७४ बालकांचा प्रवेश झाला आहे. आमगाव ८७ जागांसाठी ८६ बालकांच्या पालकांना तारीख देण्यात आली. १ जणाला तारीख दिली नाही तर ७३ बालकांचा प्रवेश झाला आहे. देवरी ५५ जागांसाठी ५५ बालकांच्या पालकांना तारीख देण्यात आली. २५ बालकांचा प्रवेश झाला आहे. गोंदिया ३५६ जागांसाठी ३२९ बालकांच्या पालकांना तारीख देण्यात आली. २७ जणांना तारीख दिली नाही तर २६५ बालकांचा प्रवेश झाला आहे. गोरेगाव ७४ जागां आहेत त्या सर्वांना तारीख दिली तर ६४ बालकांचा प्रवेश झाला आहे. सालेकसा ४४ जागांसाठी ४३ बालकांच्या पालकांना तारीख देण्यात आली. १ जणांना तारीख दिली नाही तर २१ बालकांचा प्रवेश झाला आहे. सडक-अर्जुनी ४५ जागांसाठी ३४ बालकांच्या पालकांना तारीख देण्यात आली. ११ जणांना तारीख दिली नाही तर २६ बालकांचा प्रवेश झाला आहे. तिरोडा १५१ जागांसाठी १४० बालकांच्या पालकांना तारीख देण्यात आली. ११ जणांना तारीख दिली नाही तर ११६ बालकांचा प्रवेश झाला आहे. गोंदिया जिल्हाभरात ९०३ जागांसाठी ८४७ बालकांच्या पालकांना तारीख देण्यात आली. ५५ जणांना तारीख दिली नाही तर ६६४ बालकांचा प्रवेश झाला आहे.