६४ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 05:00 IST2020-04-09T05:00:00+5:302020-04-09T05:00:56+5:30

८ एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील एकूण १०५ जणांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्यापैकी बुधवारी ६४ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. हे सर्व नमुने निगेटिव्ह आलेले आहे. तर १ नमुना यापूर्वीच पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तर ४१ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. गोंदिया जिल्ह्यातील स्वॅब नमुने घेऊन ते नागपूर मेयो येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात.

64 Samples report negative | ६४ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह

६४ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह

ठळक मुद्दे४१ स्वॅब नमुन्याची प्रतीक्षा मात्र कायम : ८८ जणांचे रुग्णालयात अलगीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील एकूण १०५ जणांचे स्वॅबचे नमुने नागपूर मेयो येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेने पाठविले होते. यापैकी ६१ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून हे सर्व नमुने निगेटिव्ह आले असून ४१ स्वॅब नमुन्यांच्या अहवालाची आरोग्य विभागाला अद्यापही प्रतीक्षा आहे.
८ एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील एकूण १०५ जणांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्यापैकी बुधवारी ६४ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. हे सर्व नमुने निगेटिव्ह आलेले आहे. तर १ नमुना यापूर्वीच पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तर ४१ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. गोंदिया जिल्ह्यातील स्वॅब नमुने घेऊन ते नागपूर मेयो येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. मात्र मागील पाच सहा दिवसांपासून प्रयोगशाळेतून अहवाल प्राप्त न झाल्याने जिल्ह्यावासीयांसह आरोग्य विभागाची सुध्दा चिंता वाढविली होती. त्यानंतर बुधवारी जिल्हा आरोग्य विभागाला ६४ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर उर्वरित नमुन्यांचा अहवाल सुध्दा लवकरच प्राप्त होणार असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

विदेशातून परतलेल्या २५१ प्रवाशांचा विलगीकरणाचा कालावधी संपला
जिल्ह्यात २५१ प्रवाशी विदेशातून प्रवास करून आले. त्यांचा व त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वच व्यक्तींचा १४ दिवस वास्तव्याच्या ठिकाणी अलिगकरणाचा कालावधी संपला आहे. तरी त्यांनी स्वत:हून अलिगकरणातच राहावे. आपली व दुसऱ्यांची काळजी घ्यावी. जिल्हा आरोग्य विभागाने म्हटले आहे.
शासकीय अलगीकरण कक्षात ८८ जण
दिल्ली निजामुद्दीन येथील प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या एकूण ८८ प्रवाशांची ओळख पटली असून या सर्वांना सध्या गोंदिया, सडक अर्जुनी आणि लहीटोला येथील शासकीय अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या सर्वांवर आरोग्य विभागाची नजर आहे.

Web Title: 64 Samples report negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.