शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

सहा हजार कर्मचाऱ्यांची इलेक्शन ड्युटी

By admin | Updated: October 9, 2014 23:03 IST

येत्या १५ आॅक्टोबर होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील विविध विभागांतील सुमारे सहा हजार १८९ अधिकारी

गोंदिया : येत्या १५ आॅक्टोबर होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील विविध विभागांतील सुमारे सहा हजार १८९ अधिकारी व कर्मचाऱ्यांची इलेक्शन ड्यूटी लावण्यात आली आहे. विशेष म्हणजे निवडणुकीसाठी शिक्षकांना सामावून घेतले असतानाच मात्र महिलांना यातून वगळण्यात आल्याची माहिती आहे.येत्या १५ आॅक्टोबर रोजी विधानसभेची निवडणूक होत आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील गोंदिया, गोरेगाव-तिरोडा, आमगाव-देवरी व सडक अर्जुनी- अर्जुनी मोरगाव या चार विधानसभा क्षेत्रांचीही निवडणूक पार पडेल. निवडणुक म्हटली की, तेथे मनुष्यबळ आलेच व त्यासाठी निवडणूक विभागाची मागील दोन महिन्यांपासून तयारी सुरू आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन व निवडणूक विभागाने जिल्ह्यातील सर्वच केंद्र व राज्य शासनाची कार्यालये, अनुदानित शाळा, महावितरण सारख्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी मागविली. त्यातील सुमारे सहा हजार १८९ अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड करून त्यांची इलेक्शन ड्यूटी लावली आहे. यात गोंदिया, गोरेगाव-तिरोडा व सडक अर्जुनी- अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रासाठी चार हजार ५७६ अधिकारी व कर्मचाऱ्यांची इलेक्शन ड्यूटी लावण्यात आली आहे. यामध्ये राज्य शासनाच्या तीन हजार १८७ कर्मचारी(जि.प.शिक्षकांसह), एक हजार ३१७ अनुदानित शाळा शिक्षक, १३ केंद्र शासनाचे कर्मचारी व ५९ महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रासाठी एक हजार ६१३ अधिकारी व कर्मचाऱ्यांची इलेक्शन ड्यूटी लावण्यात आली आहे. यामध्ये राज्य शासनाच्या एक हजार २३८ कर्मचारी (जि.प.शिक्षकांसह), ३५९ अनुदानित शाळा शिक्षक व १६ वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. अशाप्रकारे जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रांच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने एकूण सहा हजार १८९ अधिकारी व कर्मचाऱ्यांची मदत घेतली आहे. विशेष म्हणजे निवडणुकीच्या कामांसाठी जिल्हा प्रशासन व निवडणूक विभागाने यंदा महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुट दिली आहे. (शहर प्रतिनिधी)