मनरेगाच्या कामावर ५८० मजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 22:21 IST2018-04-02T22:21:49+5:302018-04-02T22:21:49+5:30
सावरटोला ग्रामपंचायत अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या गट क्रमांक २४ उमरी तलाव खोलीकरणाच्या कामावर ५८० मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

मनरेगाच्या कामावर ५८० मजूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : सावरटोला ग्रामपंचायत अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या गट क्रमांक २४ उमरी तलाव खोलीकरणाच्या कामावर ५८० मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
या कामाचे अंदाजपत्रक २० लाख सहा हजार ३०० रुपये एवढे आहे. सिंचनाची व्यवस्था, विस्तारीकरण व स्थानिक मजुरांना रोजगार उपलब्ध व्हावा हा या मागचा उद्देश आहे. सरपंच वैशाली राखडे, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप लाडे, रोजगार सेवक ग्यानीराम मेश्राम, ग्रामविकास अधिकारी गोमासे भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित होते.
सदर कामामुळे सावरटोला व उमरी येथील ३२२ महिला व १९८ पुरूष अशा एकूण ५८० मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे .