जिल्ह्यात पशुपालकांना ५७ लाखांची भरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 05:00 IST2020-02-25T05:00:00+5:302020-02-25T05:00:56+5:30
जिल्ह्यात नवेगाव-नागझिरा संरक्षित वनक्षेत्राला लागून असलेल्या गावांत वन्यप्राण्यांचा शिरकाव ही साधारण बाब आहे. मात्र या वन्यप्राण्यांकडून गावकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांची शिकार केली जात असल्याने गावकऱ्यांचे नुकसान होते. जिल्ह्यात अशाप्रकारच्या घटनांच्या मागील ५ वर्षांत ७८९ नोंद आहेत. एवढ्या घटनांमध्ये गावकºयांच्या पाळीव प्राण्यांची शिकार झाल्याने त्याचा भुर्दंडही वन विभागाला सहन करावा लागला आहे.

जिल्ह्यात पशुपालकांना ५७ लाखांची भरपाई
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात संरक्षित वनक्षेत्रांना लागून असलेल्या गावांतील नागरिकांच्या पाळी प्राण्यांवर वन्यजिवांकडून हल्ले होतात. जिल्ह्यात अशाप्रकारच्या ७८९ घटनांची नोंद मागील ५ वर्षांत करण्यात आली असून यात नागरिकांचे नुकसान झाले आहे. अशात वन विभागाला या नागरिकांना नुकसान भरपाईपोटी ५६ लाख ९८ हजार ८२४ रूपये द्यावे लागले आहे.
जिल्ह्यात नवेगाव-नागझिरा संरक्षित वनक्षेत्राला लागून असलेल्या गावांत वन्यप्राण्यांचा शिरकाव ही साधारण बाब आहे. मात्र या वन्यप्राण्यांकडून गावकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांची शिकार केली जात असल्याने गावकऱ्यांचे नुकसान होते. जिल्ह्यात अशाप्रकारच्या घटनांच्या मागील ५ वर्षांत ७८९ नोंद आहेत. एवढ्या घटनांमध्ये गावकºयांच्या पाळीव प्राण्यांची शिकार झाल्याने त्याचा भुर्दंडही वन विभागाला सहन करावा लागला आहे. यासाठी वन विभागाला ५७ लाख ९८ हजार ८२४ रूपये नुकसान भरपाईपोटी मोजावे लागले आहे.
वर्षनिहाय ही आकडेवारी बघितल्यास सन २०१५-१६ मध्ये २०७ प्रकरणांत १० लाख ६४ हजार ३१२ रूपयांची भरपाई देण्यात आली आहे. सन २०१६-१७ मध्ये ११६ प्रकरणांत आठ लाख १९ हजार ४१२ रूपये, सन २०१७-१८ मध्ये १३४ प्रकरणांत १० लाख २९ हजार ७८३ रूपये, सन २०१८-१९ मध्ये १४ लाख १२ हजार २७९ रूपये तर मार्च २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत १४८ प्रकरणांत १३ लाख ७३ हजार ३८ रूपयांची नुकसान भरपाई वन विभागाला द्यावी लागली आहे.
विशेष म्हणजे, उन्हाळ््यात पाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांचा वनक्षेत्राला लागून असलेल्या गावांत शिरकाव वाढतो. शिवाय शेतकरी शेतात असतानाही वन्यप्राण्यांकडून पाळीव प्राण्यांवर हल्ला केला जात असल्याच्या घटना घडतात. अशात मात्र वन विभागाला त्याचा भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे दिसते.