आसोलीतून पकडली ५५ हजारांची दारू ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:28 IST2021-05-10T04:28:44+5:302021-05-10T04:28:44+5:30
गोंदिया उपविभागात कोरोना संसर्गजन्य विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर प्रतिबंधक उपाययोजना उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे व त्यांचे ...

आसोलीतून पकडली ५५ हजारांची दारू ()
गोंदिया उपविभागात कोरोना संसर्गजन्य विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर प्रतिबंधक उपाययोजना उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे व त्यांचे कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना आसोली येथील वसंत खरोले याच्या घरी धाड घालून माजघराच्या धाब्यावर २६ नग प्लॅस्टिकचे पॉलिथीनमध्ये ५२० किलो मोहफूल किमती ५२ हजार ३ प्लॅस्टिकच्या डबकीत १५ लिटर मोहफुलांची दारू किंमत २ हजार २५० रुपये असा एकूण ५४ हजार २५० रुपयांचा माल जप्त केला. नायक पोलीस शिपाई अशोक अंबरवाडे यांच्या तक्रारीवरून गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई)(फ) अन्वये गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे, नायक पोलीस शिपाई अशोक अंबरवाडे, चकोले, नागदेवे, गोसावी, अशोक कांबळे यांनी केली.